पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या आगामी शिक्षक भरतीमध्ये बी. कॉम, बी. एड्, धारकांना येणाऱ्या अडचणी दूर करा.
कंधार प्रतीनीधी उज्वला गुरसुडकर
आज दि 28 नोव्हेंबर रोजी युवा शाही संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे महाराष्ट्र राज्यात(B ED ) बी. एड् ला प्रवेश घेण्यासाठी पदवी ही पात्रता आवश्यक आहे. साधारणपणे पदवी ही तीन शाखेत जास्त प्रमाणात करणारे विद्यार्थी असतात. बी.ए., बी. कॉम, बी. एस. सी. (कला/विज्ञान/वाणिज्य) ह्या शाखेतून पदवी पास विद्यार्थी हे बी. एड् ला प्रवेश घेतात. पदवी आणि बी. एड् हा कोर्स पूर्ण केलेल्या पात्रता धारकांची शिक्षक अभियोग्याता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) ह्या परीक्षे मार्फत माध्यमिक शिक्षक म्हणून निवड होत असते. बी. ए. आणि बी. एस. सी ह्या पदवीच्या वर्गात अभ्यासलेले विषय हे दहावी पर्यंत असतात. बी. कॉम मध्ये शिकलेले विषय हे दहावी पर्यंत असत नाहीत. बी. कॉम मध्ये अभ्यासलेले विषय हे अकरावी पासून सुरू होत असतात. आम्ही महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी बी. कॉम नंतर बी. एड् हा कोर्स पूर्ण केलेले आहोत . बी.कॉम, नंतर आम्हीं शासनाच्या नियम व अटीच्या अधीन राहून बी. एड् ला प्रवेश घेतला आहे. बी.एड् ला प्रवेश घेताना बी. कॉम बी. एड् धारकांना पुढे अडचण निर्माण होईल यासंदर्भात माहिती दिली नाही . बी.कॉम ह्या पदवीचा अभ्यास करताना आम्हीं अनिवार्य विषय म्हणून इंग्रजी आणि द्वितीय भाषा म्हणून मराठी किंवा हिंदी हे विषय अभ्यासलेले अहोत. बी. कॉम नंतर बी. एड् ला प्रवेश घेताना आम्हांस पुढे अडचणी येतील याची अजिबात कल्पना नव्हती.आम्ही बी. कॉम नंतर बी एड् ला जे माध्यम अभ्यासलेलं आहे त्या माध्यमातून आम्हांस पुढे शिकविण्याची परवानगी द्यावी व पदवीला विषय आहेत तोच त्या विषयाचा शिक्षक होतो ही अट शिथील करावी व समस्त बी. कॉम बी एड् धारकांना न्याय द्यावा ही मागणी जिल्ह्याधीकारी मार्फत १)मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त पुणे महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नांदेड जिल्हा यांना निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या यावेळी
बी. कॉम, बी,एड् धारक व
तुषार देशमुख,भास्कर गोविंदराव तळणे,श्रीहरी रामराव मुंडकर , सुरेश धोंडिबा वाघमारे,आकाश उत्तमराव सोळंके आदी युवक उपस्थित होते