वीज पडून तीन ऊसतोड मजुरांचा मृत्यू
---------------------------------------
नांदेड (उज्वलाताई गुरसुडकर) हद्दीतील मौ.धावरी, ता.लोहा शिवारात बालाघाट साखर कारखाना,सांगवी चे ऊसतोड मजूर सुधाकर किशन पवार यांच्या शेतात ऊसतोड करत असताना दि.18/10/2022 रोजी वेळ 5:30 वा. च्या सुमारास विजेच्या कडकडाटात पाऊस सुरू झाल्यामुळे ऊसतोड करणारे कुटुंबातील महिलासह कामगार हे शेतातील लिंबाचे झाडाच्या खाली उभे टाकलेले असताना सदर लिंबाचे झाडावर वीज पडून त्यात 1) माधव पिराजी डुबूकवाड, वय 40 वर्ष, रा. पानभोसी, ता.कंधार. 2) पोचीराम शामराव गायकवाड,वय 50 वर्ष, रा.पेठ पिंपळगाव, ता.पालम. 3) रूपाली पोचीराम गायकवाड, वय 16 वर्ष, रा.पेठ पिंपळगाव, ता.पालम हे वीज पडून मयत झाले आहेत.
तसेच 4) पूजा माधव डुबुकवाड, वय 16 वर्ष, रा.पानभोसी, ता.कंधार ही मुलगी जखमी झाल्यामुळे तिच्या पुढील उपचारासाठी स.द नांदेड येथे रेफर करण्यात आलेले आहे, तिन्ही मृतदेह सरकारी दवाखाना लोहा येथे पोस्टमार्टम कामी घेऊन आलेले आहोत. तरी अ मृ दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत.