सचिन वावरे यांनी दाखविली माणुसकी
रोख रक्कम, एटीएम व महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स दिली परत
----------------------
गेवराई (प्रतिनिधी) आजच्या दुनियेतही ईमानदार माणसाची कमी नसल्याची माणुसकी अंतरवली येथील सचिन वावरे यांनी दाखवून दिली. रोख रक्कम, एटीएम व महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स सापडल्यानंतर तत्परता दाखवत सोशल मीडियाच्या माध्यमातून परत केली करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील अंतरवली येथील रहिवाशी असलेले सचिन वावरे हे गेल्या दोन दिवसांपूर्वी गावाकडून तलवाडा रोडने गेवराई कडे येत होते. यावेळी ते कोल्हेर जवळ आले असता त्यांना रोडला एक पर्स आढळून आली. त्यांनी गाडी थांबवून ती पर्स घेऊन खोलून बघितली असता त्यात त्यांना काही 500 व 100 रुपयांच्या काही नोटा एकूण पाच हजार रुपये रोख रक्कम, एटीएम, काही महत्वाची कागदपत्रे व संजीवनी शिंदे या नावाच्या वेतन पावत्या आढळून आल्या यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या मोबाईल वर एक पोस्ट टाईप करून याबाबत सविस्तर पोस्ट तयार करून त्यात मोबाईल नंबर टाकून फेसबुक व व्हाट्सअप ग्रुप ला सोशल मीडियावर त्याबाबत पोस्ट केली. दरम्यान काही वेळातच त्यांना एक कॉल आला व आदरील पर्स ही एका शिक्षिका असलेल्या संजीवनी शिंदे यांची आहे. यानंतर त्यांनी तात्काळ त्यांची भेट घेऊन ती पर्स त्यांच्या स्वाधीन केली. त्यांची ही माणुसकी पाहून शिक्षिका श्रीमती शिंदे या भरावून गेल्या त्यांनी व त्यांनी सचिन वावरे यांचे तोंडभरून कौतुक करत आभार मानले. सचिन वावरे यांच्या या माणुसकीबद्दल सोशल मीडिया सह सर्वस्तरातून कौतुक होत आहे.