गेवराई येथील भगवान चिंतेश्वराला "ताम्र स्वरूप"
----------------------------------------
शुभम घोडके
गेवराई ( प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील ग्रामदैवत असलेले चिंतेश्वर मंदिर हे प्राचीन स्थापत्य कलेचा आविष्कार असलेले प्राचीन काळापासून आध्यात्मिक केंद्र असणारे गेवराई शहरातील नामांकित चिंतेश्वर मंदिर ,येथील मठाधिपती आदरणीय गुरुवर्य ह. भ. प.दिलीप (बाबा) घोगे चिंतेश्वर मंदिरांच्या परिसरात विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.
मागील काही वर्षापासून प्राचीन पुराणिक रामायण कालीन इतिहास असलेली चिंतेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीची अतिरिक्त होणाऱ्या जलाधिषेकामुळे यावर उपाय म्हणून चिंतेश्वर संस्थांचे मठाधिपती दिलीप (बाबा) घोगे यांनी उपाय म्हणून चिंतेश्वर महादेवाची पिंड पितळ किंवा तांबे धातूमध्ये मडविण्याचे ठरवले. त्यासाठी परिसरातील सर्व शिष्य मंडळी तत्परतेने सहभागी झाले. सोनगीर येथील विनायक भाऊ कासार (कारागीर) कारागिरांना त्यांच्या अवजार्यासह सोमवारी सर्व साहित्य व त्यांचे कारागीर यांना बोलावण्यात आले. असता गेल्या चार दिवसाच्या अथक परिश्रमानंतर भगवान चिंतेश्वराला ताम्र स्वरूप देण्यात आले आहे. विशेष म्हणजे तांबे हा धातू शास्त्रीय तसेच अध्यात्मिक दृष्ट्या पवित्र व उत्कृष्ट मानला जातो त्यामुळे झाड तांब्याच्या आवरण पूर्णपणे लावून तसेच पितळी शेषनाग व लिंग तयार करण्यात आले आहे यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचा 67कि. धातू वापरण्यात आला. यावेळी भक्तगणांनी सहकार्य केले.ताम्र रूप चिंतेश्वर दर्शन रविवार पासून सर्व भाविकांसाठी खुले होणार असल्याची माहिती दिली.