उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा सरकारी बॅन्केला दणका , शेतकर्यांच्या खात्याचा होल्ड निघाला :
अजय भैय्या दाभाडे यांच्या प्रयत्नाला यश
गेवराई दि. 18 : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा धोंडराई ता. गेवराई येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेला दणका दिल्याने, बॅन्केने
शेतकर्यांच्या खात्याला लावलेला होल्ड निघाला असून, तालुका प्रमुख
अजय भैय्या दाभाडे यांच्या आंदोलनला यश मिळाले आहे.
शेतकर्यांना न्याय मिळवून दिल्याने शेतकर्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
गेवराई तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकेने थकीत कर्ज असलेल्या शेतकर्यांच्या खात्याला होल्ड लावण्याने, शेतकर्यांना इतर शासकीय अनुदानाचे पैसे मिळत नव्हते. या संदर्भात, शेतकर्यांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख अजय भैय्या दाभाडे यांच्याशी संपर्क साधून, बॅन्केच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेली अडवणूक लक्षात आणून दिली. त्यामुळे, बुधवार ता. 18 रोजी धोंडराई ता. गेवराई येथील शाखेत जाऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अजय दाभाडे यांनी जाब विचारला. सरकारचे धोरण आणि नियमावली समजावून सांगितली. एवढ्यावरही तुम्ही ऐकणार नसाल तर बॅन्केच्या दारातच शिवसेना स्टाईलने आंदोलन करीन, असा निर्णायक इशारा देताच, बॅन्केच्या शाखा व्यवस्थापकाने शेतकर्यांच्या खात्याला लावलेला होल्ड काढण्याचे आश्वासन दिले. गेल्या काही दिवसांपासून शेतकर्यांच्या अडवणूक करण्याचे धोरण बॅन्केने सुरू ठेवले होते. त्यामुळे, शेतकर्यांना त्यांच्याच खात्यात असलेल्या पैशाचा उपयोग होत नव्हता. बॅन्क आडमुठी भूमिका घेऊन, शेतकर्यांची अडवणूक करीत होते.गेवराई तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकेने थकीत कर्ज असलेल्या शेतकर्यांच्या खात्याला होल्ड लावण्याने, शेतकर्यांना इतर शासकीय अनुदानाचे पैसे मिळत नव्हते. या संदर्भात, शेतकर्यांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख अजय भैय्या दाभाडे यांच्याशी संपर्क साधून, बॅन्केच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेली अडवणूक लक्षात आणून दिली. त्यामुळे, बुधवार ता. 18 रोजी धोंडराई ता. गेवराई येथील शाखेत जाऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अजय दाभाडे यांनी जाब विचारून, थेट आंदोलन करण्याचा इशारा दिला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा धोंडराई ता. गेवराई येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेला दणका दिल्याने, बॅन्केने
शेतकर्यांच्या खात्याला लावलेला होल्ड निघाला असून, तालुका प्रमुख
अजय भैय्या दाभाडे यांच्या प्रयत्नाला यश मिळाल्याने,
शेतकर्यांना न्याय मिळल्याने, शेतकर्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
