*आ.विजयसिंह पंडित यांच्या प्रयत्नातून गेवराई शहराच्या विकासासाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजुर*
================
*शहरात विविध ठिकाणी दहा कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ*
================
गेवराई, दि.४ (प्रतिनिधी) ः- माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आ. विजयसिंह पंडित यांच्या प्रयत्नातून अतिशय अल्प कालावधीत गेवराई शहराच्या सर्वांगिन विकासासाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. मंजुर निधीतून अतिशय दर्जेदार कामे होत आहेत, भविष्यात शहराच्या विकासासाठी अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाची आणि आ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक राधेशाम येवले यांनी केले. गेवराई शहरातील दहा कोटी रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व रणवीर पंडित, दत्ता दाभाडे, खालेद कुरेशी, दिनेश घोडके, अक्षय पवार, जयसिंग माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंगळवार, दि.४ नोव्हेंबर रोजी सकाळी गेवराई शहरात विविध ठिकाणी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये गेवराई नगर परिषद अंतर्गत तय्यबनगर येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, भगवान नगर येथे सभामंडप व संरक्षण भिंत बांधकाम, शिवाई नगरी येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, संजयनगर येथे भिल्ल समाजाची स्मशानभुमी संरक्षण भिंत बांधकाम, विरशैव समाजाच्या स्मशानभुमीच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम, बसवेश्वर कॉलनी येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, संजयनगर येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकाम तसेच मसनजोगी समाजाच्या सामाजिक सभागृहाचे बांधकाम आणि महादेव मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम, आदर्शनगर येथे सेवा मंडप बांधकाम, अचानक नगर येथे सभामंडप बांधकाम, सावतानगर येथे सभामंडप बांधकाम, विद्यासागर कॉलनी येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, सरस्वती कॉलनी येथे अभ्यासिकेचे नुतणीकरण, अहिल्यानगर येथे सिमेंट रस्ता बांधकाम, शाहूनगर येथे रस्ता बांधकाम अशा विविध १० कोटी रुपये किंमतीच्या विकास कामांचा समावेश आहे.
यावेळी बोलताना रणवीर पंडित म्हणाले की, आ. विजयसिंह पंडित यांच्या आमदारकीच्या दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये आपण गेवराई शहरासह मतदार संघामध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही गेवराई शहरामध्ये विकासकामे करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मंजुर झालेली सर्व कामे दर्जेदार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी जो शब्द दिला होता तो यानिमित्ताने पूर्ण केला जात आहे. येणाऱ्या काळात गेवराई शहरामध्ये उर्वरित विकास कामे करून कायापालट केला जाईल असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी अमित वैद्य, सचिन दाभाडे, संदिप मडके, नाना खरात, अनिल मोटे, रविंद्र बोराडे, प्रभाकर भालशंकर, बाळासाहेब दाभाडे, लहूराज लोखंडे, विजय सुतार, नवीद मशायक, शेख मोहसीन, इम्रान अन्सारी, बाबू बेदरे, सय्यद सुभान, निजामभाई, राहूल मस्के, किशोर वादे, वसीम फारुकी, रवि कानडे, शेख बाबा, मोहसीन बागवान, हेमंत दाभाडे, विशाल होनमाने, बबलू सानप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध प्रभागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
