उधार दाढी कटिंग न केल्याने धाराशिव शहरातील युवकावर हल्ला; गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल
धाराशिव (प्रतिनिधी) – उधार दाढी कटिंग करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून न्यू क्लासिक जेंट्स पार्लर (पोस्ट ऑफिसजवळ, धाराशिव) येथे ऋतुराज मोरे या युवकावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने दाढी कटिंग उधार कर पैसे नहींत असे संगितले. मात्र दुकानातील कर्मचाऱ्यांनी उधार सेवा नाकारली. यामुळे संतप्त होऊन त्याने ऋतुराज मोरे यांच्यावर हल्ला केला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ संबंधित आरोपीविरोधात कारवाई करून दहशत पसरविणाऱ्या वर तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
