महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

मंत्रीमंडळ बैठकीत टाकळगाव बॅरेजच्या कामास मंजुरी, आ. विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश निवडणूक प्रचारात दिलेला ' शब्द ' अमरसिंह पंडित यांनी पाळला

मंत्रीमंडळ बैठकीत टाकळगाव बॅरेजच्या कामास मंजुरी, आ. विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश 
-----------------------------------------------
निवडणूक प्रचारात दिलेला ' शब्द ' अमरसिंह पंडित यांनी पाळला 
-----------------------------------------------

गेवराई, दि.१ (प्रतिनिधी) ः- विधानसभा निवडणुकी दरम्यान सिंदफणा नदीवरील टाकळगाव कोल्हापूरी पध्दतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याचे काम करू असा शब्द जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी दिला होता. त्यांनी दिलेला शब्द खरा करून दाखविला आहे. मागील अनेक वर्षांपासून अमरसिंह पंडित आणि आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विजयसिंह पंडित यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मंत्रीमंडळ बैठकीत टाकळगाव बॅरेजच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सिंदफणा काठावरील सिंचन क्षेत्रात भरीव वाढ होणार असल्याची माहिती आ. विजयसिंह पंडित यांनी देवून महायुती सरकारचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

गेवराई सारख्या सततच्या दुष्काळग्रस्त तालुक्यात सिंचन सुविधा वाढाव्यात यासाठी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी संधी मिळेल तेथे प्रयत्न केले. गोदावरी प्रमाणे सिंदफणा नदीपात्रात सुध्दा बारमाही पाणी असावे यासाठी त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. विधानसभा निवडणुकीत टाकळगाव को. प. बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याचे आश्वासन आ. विजयसिंह पंडित यांच्या जाहिरनाम्यात देण्यात आले होते. आ. विजयसिंह पंडित यांच्या प्रयत्नांमुळे याकामी मंगळवार, दि. १ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत टाकळगाव बॅरेजच्या कामास १९.६६ कोटी रुपये अंदाजित किंमतीसाठी राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली होती. त्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाही करून जलसंपदा विभागाने राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सादर केलेल्या प्रस्तावानुसार मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी टाकळगाव बॅरेजच्या कामास अंतिम मान्यता देण्यात आली आहे. या कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सिंदफणा नदीवरील इतर सर्व बॅरेजची कामे सुद्धा लवकरच मंजुर होतील असा विश्वास आ. विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केला आहे.

टाकळगाव बॅरेजमुळे परिसरातील शेकडो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. टाकळगाव, हिरापूर, पिंपळगाव कानडा, औरंगपूर कुक्कडा, कोपरा, दगडगाव, पारगाव जप्ती, हिंगणी हवेली, नांदुर हवेली यांसह परिसरातील गावांच्या सिंचनासाठी या बॅरेजचा फायदा होणार आहे. बीड आणि गेवराई तालुक्यातील सिंदफणा नदीकाठच्या गावांनाही त्याचा लाभ होईल. मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानंतर गेवराई विधानसभा मतदार संघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले. टाकळगाव व परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून आ. विजयसिंह पंडित व अमरसिंह पंडित यांचे आभार मानले.


*चौकट*
*सरपंच रुद्रा कदम यांचे कडून साखर वाटून आनंद व्यक्त*

सिंदफणा नदीपात्रात टाकळगाव येथे नवीन बॅरेजचे काम मंजुर झाल्याबद्दल टाकळगाव ग्राम पंचायतीचे सरपंच रुद्रा कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावात डफडे वाजवून साखर वाटप करत आनंद व्यक्त केला. त्यांनी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित आणि आ विजयसिंह पंडित यांचे आभार मानले. ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.