श्री क्षेत्र वेरूळ येथे 17 सप्टेंबर 2025 विश्वकर्मा वंशीय समाजाच्या मेळाव्यास उपस्थित राहावे : अशोक गायकवाड
====================
गेवराई (प्रतिनिधी) राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात विविध विश्वकर्मा वंशीय समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी आगामी काळात समाजामध्ये जनजागृती होण्यासाठी येत्या 17 सप्टेंबर रोजी वेरूळ येथे विश्वकर्मा वंशीय समाजाचा मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्यास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे गेवराई तालुकाप्रमुख अशोक गायकवाड यांनी केले आहे.
श्री क्षेत्र वेरूळ येथे बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या विश्वकर्मा समाजाच्या राज्या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक पंचाळ सर असणार आहेत. नियोजन समितीचे अध्यक्ष राजेश नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.विश्वकर्मा वंशीय समाजाच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले जात आहे. या मेळाव्यात समाजाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाला यशस्वी करावे अशी अपेक्षा आहे. असे आवाहन गेवराई तालुकाध्यक्ष अशोक गायकवाड,, बाबासाहेब सांगुळे, नवनाथ सांगुळे, बाळू गायकवाड नंदू शिंदे किशोर वाघमारे महेश नन्नवरे अमोल पिंपळे गणेश पांचाळ लहू सोनवणे यांनी केले आहे
