सोपान हाळमकर,कमर एजाज यांच्या जाण्याने मराठी आणि उर्दूत मोठी पोकळी :सय्यदअल्लाउद्दीन
आष्टी प्रतिनिधी
आक्रोश या कवितासंग्रहामुळे सर्वदूर परीक्षित झालेले कवी,लेखक सोपान हाळमकर यांच्या जाण्याने मराठी साहित्य विश्वास मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांनी कथाही तितक्याच तोलामोलाने लिहिल्या.प्रशासकीय क्षेत्रात उच्च पदावर राहून सुद्धा मोठेपणाचा स्पर्श त्यांना कधी झाला नाही.आमच्या सारख्या नवख्या कवींच्या गोतावळ्यात सुद्धा ते खूप रममान होत.नव्या लेखक,कवींना ते सहज बोलता-बोलता मार्गदर्शन करून जायचे.आष्टीच्या हंबर्डे महाविद्यालयात एडवोकेट बन्सीधरराव धोंडीबापू हंबर्डे साहित्य पुरस्कार सन्मानाने स्वीकारल्यानंतर मिळालेल्या रकमेच्या पाकिटात तितकीच रक्कम टाकून त्यांनी पाकीट परत केले होते.उर्दूचे सुप्रसिद्ध शायर कमर एजाज यांचे नुकतेच वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले.त्यांची स्वतःची एक शैली होती.आईना ही त्यांची गाजलेली कविता होती.शब्द आणि सूर लाभलेले हे शायर भारतभर फिरले.त्यांनी उर्दू कवी संमेलन आणि मुशायऱ्यातून स्वतःचा दबदबा निर्माण केला होता.युट्युब मुळे ते सर्वांना परिचित झाले होते.अतिशय साधी राहणी आणि दमदार शायरी यासाठी ते सदैव स्मरणात राहतील.असे कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी प्रसिद्ध कवी,लेखक सोपान हाळमकर आणि शायर कमर एजाज यांच्या जाण्याने शब्दांतून हळहळ व्यक्त केली.
