*खोट्या पदभरतीच्या जाहिरातीसंदर्भात*
*नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन*
_पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाकडून स्पष्टीकरण_
बीड,
जिल्ह्यात पशु आरोग्य सेवक पदासाठी शासनामार्फत भरती होत असल्याची खोटी माहिती समाज माध्यमे, विविध माध्यमांतून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात पशुसंवर्धन विभागामार्फत अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे, की सद्यस्थितीत अशा कोणत्याही भरतीसाठी प्रक्रिया सुरू नाही. ही माहिती फसवणूक करणाऱ्यांनी हेतूपुरस्सर पसरवली आहे. त्याद्वारे आर्थिक लाभ मिळण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. आर.डी. कदम यांनी कळवले आहे.
अशा बनावट भरतीच्या जाहिरातींना बळी न पडता नागरिकांनी अधिकृत शासकीय संकेतस्थळांवरूनच खात्री करावी. बीड शहर पोलिस विभागामार्फत यासंदर्भात उपाययोजना करण्यात येत आहेत. संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून नागरिकांनी कोणतीही भरती किंवा जाहिरात मिळाल्यास तिची खातरजमा अधिकृत शासकीय संकेतस्थळावरून करावी. कुठलीही संशयास्पद माहिती आढळल्यास तत्काळ नजिकच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असेही कदम यांनी कळवले आहे.
******
