पत्रकार उत्तम हजारे यांचा मुलगा नोबल १२ सप्टेंबर रोजी होणार तैवानला रवाना
बीड, दि.२५ ( प्रतिनिधी ) बीड येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांचा मुलगा नोबेल हजारे हा उच्च शिक्षणासाठी दि.१२ सप्टेंबर रोजी तैवानला रवाना होत असून, पुढील उच्च शिक्षणासाठी नोबेलला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत .
बीड येथील संस्कार विद्यालयात प्राथमीक, बलभीम महाविद्यालयात महाविद्यालयीन तर छत्रपती संभाजीनगर येथे विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत असलेला नोबेल हजारे हा तैवान देशात उच्च शिक्षण घेत आहे, काही दिवसांपूर्वी तो बीडला आला होता. आता तो पुन्हा दि.१२ सप्टेंबर रोजी पुढील उच्च शिक्षणासाठी तैवान देशात जात आहे. तैवानमधील नामांकित विद्यापिठात तो उच्च शिक्षण घेत आहे . नोबेलला पुढील शिक्षणासाठी मित्रपरिवार, नातेवाईक, गुरुजन, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत .
----------
