महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, तर लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी..." धोंडराईच्या सरपंच शितल साखरे यांची भावूक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

"श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, तर लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी..." धोंडराईच्या सरपंच शितल साखरे यांची भावूक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

गेवराई ( शुभम घोडके ) 
"बाप" हे शब्दापलीकडचे अस्तित्व असते. कष्ट करणाऱ्या बापासाठी लेक ही मायेची सावली असते, तर संघर्षाच्या काळात मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा बाप तिच्या विजयाची 'बुलंद कहाणी' ठरतो. असाच काहीसा कृतज्ञतेचा आणि भावनिक संदेश धोंडराईच्या विद्यमान सरपंच शितल अशोकराव साखरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला असून, त्यांची ही पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
सरपंच शितल साखरे यांनी आपल्या पोस्टमध्ये बापाच्या अथांग प्रेमाचे आणि कष्टाचे वर्णन करताना म्हटले आहे की, "श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी असते, तर लढणाऱ्या लेकीसाठी बाप ही एक बुलंद कहाणी असते. 'तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे' असे म्हणणारा बाप नशिबानेच मिळतो. अशा कणखर आणि प्रेमळ माणसाच्या पोटी जन्म घेणे म्हणजे सात जन्मांचे पुण्य एकाच जन्मात मिळण्यासारखे आहे."शितल साखरे या केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर एक कर्तबगार कन्या म्हणूनही ओळखल्या जातात. आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रवासात वडिलांनी दिलेल्या पाठबळाचा त्यांनी या पोस्टद्वारे आदर केला आहे. एका मुलीच्या प्रगतीत वडिलांचा विश्वास किती मोठी भूमिका बजावतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे साखरे यांची ही पोस्ट असल्याचे बोलले जात आहे.सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर होताच नेटिझन्सनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेक मुलींनी "प्रत्येक मुलीला असाच खंबीर बाप मिळो" अशा भावना व्यक्त केल्या आहेत. बाप-लेकीच्या नात्यातील हा हळुवार कोपरा आणि संघर्षातील ही साथ आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.ग्रामीण भागात महिला सरपंच म्हणून काम करताना येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी वडिलांकडून मिळालेली 'बुलंद साथ' हीच आपली खरी शक्ती असल्याचेही त्यांनी आपल्या कृतीतून वेळोवेळी दाखवून दिले आहे.