सर्वसामान्यांची जाण असणारे:- अशोक उर्फ बाबू (नाना) गायकवाड
----------------------------------------
माणसाला परिस्थिती जगवायला शिकवते कारण कुठल्याही परिस्थितीत माणूस कितीही संकट आलं तरी त्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद निर्माण करतो परिस्थिती गरीब असो किंवा श्रीमंत खरंतर गरिबी ही स्थिती एक वेदनादायी असते या परिस्थितीमध्ये गरिबीच्या अनेक झळा आपल्याला सोसाव्या लागतात असो याचं गरिबीवर मात करून एक संघर्षमय जीवन जगणारे अशोक उर्फ बाबू (नाना) गायकवाड हे होय. वृत्तपत्राच्या लेखणीतून गरिबीतून समाजाच्या हितासाठी लढणारा आपला माणूस म्हणून कोण आणि त्यांनी केलेल्या विविध कार्याचा आढावा यानिमित्ताने त्या कार्यावर हा शब्दप्रपंच..
गेवराईच्या सामाजिक व धार्मिक पटलावर अशोक छगनराव गायकवाड उर्फ बाबू नाना यांचे नाव सातत्याने चर्चेत असतं खरंतर गेवराई शहरातील दाभाडे गल्ली येथील रहिवासी असलेले अशोक गायकवाड उर्फ बाबू (नाना) म्हणून अधिक लोकप्रिय आहेत. त्यांचे वडील छगनराव गायकवाड हे कारागीर म्हणून सुतार काम करत असताना यांचे निधन 18 /07/ 1999 रोजी झाले.आपल्या घरचा करता माणूस नसल्याने घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची बनली होती मुलांची शाळेची फीस भरण्यास देखील पैसे नसल्यामुळे शिक्षणापासून मुलगा वंचित राहू नये म्हणून आई सत्यभामा यांनी घर काम करत इतरही काम केले त्यातून मिळणाऱ्या पैशातून अशोक उर्फ बाबू (नाना) गायकवाड यांना इयत्ता दहावी पर्यंत शालेय शिक्षण पूर्ण करण्यास देखील आई सत्यभामा यांनी मदत केली. त्यानंतर घरची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक झाल्याने स्वतः हा अशोक गायकवाड 30 रुपये रोजाने पेंटरच्या हाताखाली रोजंदारीवर काम करण्यासाठी सक्रिय झाले कुटुंबाचा उद्धार निर्वाह भागवण्याची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर आली यांचे भान ठेवून ते सातत्याने काम करण्यास अग्रेसर राहिले. विवाहित झाल्यानंतर पत्नी अलका अशोक गायकवाड यांनीही आपल्या पतीला संकटात धीर दिला.त्यानंतर वडिलांचा कारागीर कामाचा वसा जोपासत सुतार कामात कारागीर म्हणून काम करत होते. ते नेहमी म्हणतात की माझे जिवलग जीवाला जीव देणारे दोन सहकारी मित्र म्हणजे श्री.संतोष (नाना) भंडारी आणि माजी नगराध्यक्ष महेश (अण्णा) दाभाडे यांनी माझ्या संकटात मला साथ दिली त्यांनी केलेले सहकार्य मी कधीही विसरणार नाही असे ते अनेक वेळा बोलताना सांगत असतात असे असताना सामाजिक कार्याची गोडी देखील त्यांना उब देत राहिली. सामाजिक कार्य करत असताना अशोक गायकवाड यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून त्यांचे सहकारी मित्र स्व.युवराज मोटे, श्री.संतोष भंडारी,महेश दाभाडे दीपक आतकरे ,कैलास माने यांच्यासोबत त्यांनी मराठा महासंघ या संघटनेत काम केले असून पुढे धार्मिक कार्याचा वसा जोपासत मराठा महासंघाच्या वतीने धार्मिक कार्यात आपण अग्रेसर असावेच हा ध्यास ठेवून राजेंद्र भंडारी, संतोष भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा महासंघ दुर्गा उत्सव समिती या धार्मिक कार्याचा कार्यवाहक म्हणून 2009 पासून जबाबदारी सांभाळत आले आहेत यापुढेही संभाळत आहेत असे करत असताना छोट्या- मोठ्या सामाजिक धार्मिक सलोख्याच्या माध्यमातून एक सलोख्याचा ऑडिट म्हणून आपण आपल्या समाजात समाज हितासाठी चांगले काम केले पाहिजे हिच एकमेव संकल्पना देखील त्यांच्या मनात घर करून बसली होती त्या संकल्पनेतून सर्वप्रथम विश्वकर्मा जयंती उत्सव 2016 रोजी समाजाच्या लोकवर्गणीतून साजरी करण्यात आली या सामाजिक कार्याची त्यांना अधिक भरारी देत राहिली त्यांच्या चांगल्या कार्याची पावती म्हणून विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नागोजीराव पांचाळ सर यांनी अशोक गायकवाड यांच्यावर गेवराई तालुका प्रमुख पदाची जबाबदारी दिली. आणि या तालुकाप्रमुख पदाची धुरा सांभाळत असताना गेवराई तालुक्यातील वाडी, वस्ती ,ग्रामीण भागात विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या शाखा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्या या माध्यमातून ग्रामीण भागात सुतार समाजाचा "लोकसवांद" साधून ग्रामीण भागातील सुतार समाजाच्या आणि अड-अडचणी देखील त्यांनी जाणून घेऊन त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला. अशोक गायकवाड यांनी सुतार समाजाचे शासन दरबारी तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, सरकारी दवाखाना नगरपरिषद येथे अडीअडचणीत असलेल्या समाजातील प्रत्येक माणसाला व गोरगरिबाचं काम करण्यासारखे असेल तर ते विनामूल्य खर्च व्हावा यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात सर्वसामान्य लोकांना चुकीच्या मार्गाने नेत असणाऱ्या लोकांना ते वेळीच आळा घालत आहेत असे मी अनेक वेळा अनुभवले आहे. असो त्यांचा परिवार आई सत्यभामा छगनराव गायकवाड, पत्नी सौ.अलका अशोक गायकवाड, मुलगा अभिषेक अशोक गायकवाड, मुलगी वैष्णवी अशोक गायकवाड असा परिवार असून आता सुख समृद्धीने नांदत आहेत अशा परिस्थितीत चॅलेंजिंग स्वीकारून एक समाजातील आदर्श निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाईल अशा आदर्श कुटुंबातील सदस्याला पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
लेखक शुभम घोडके (उपसंपादक)
मो. 8308390008
चौकट -समाजासाठी विविध आंदोलनात सहभाग
समाजात काम करत असताना शासन -प्रशासन या कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता रोखठोकपणे समाजाच्या हितासाठी आंदोलने, मोर्चे ,रस्ता, रोको, करण्यात त्यांची आक्रमक भूमिका नेहमी पाहायला मिळाली वेरूळ जि औरंगाबाद(संभाजी नगर) येथे विश्वकर्मा वंशिय समाज संघटनेच्या वतीने तिथे होणाऱ्या विश्वकर्मा जयंती सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून अशोक गायकवाड यांची उपस्थिती सातत्याने असते.