एकच लक्ष एकच ध्येय अनुसरूया ! साधुनी संवाद बंधुत्वाचा.नाभिक समाजासाठी एक पाऊल पुढे
नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
राष्ट्रीय नाभिक ऐकता महासंघ अध्यक्ष श्री भगवानराव (अण्णासाहेब) बिडवे व आरक्षण समिती अध्यक्ष श्री. शिवदास जी फुलवळकर सर यांचं संघटीत विचारसरणी तुन एकच ध्यास एकच ध्येय अनुसरून बंधू भाव जोपासुन समाज हिताच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी व इतर अनेक सामाजिक कार्य करण्यासाठी संबंधित संघटन शपथविधी
दिनांक 14 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे नाभिक आरक्षण समिती आणि नाभिक एकता महासंघ यांच्या मधील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांची महत्त्वपूर्ण बैठक होऊन या बैठकीत समाजाची दशा आणि दिशा यावर सकारात्मक चर्चा होऊन तसेच समाजातील शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांसाठी व व्यवसायातील इतर समाजाची व युवकांची झालेली घुसकोरी पाहता आपण नुसते झेंडे हातात घेऊन चालणार नाहीत तर परिवर्तनाची नांदी घेऊन परिवर्तनाचा झेंडा हातात घेऊन काम करण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला त्या दृष्टिकोनातून आपली युवक पिढी ही कोणत्या दिशेने मार्गक्रमण व्हायला हवी त्यासाठी काय करावे लागेल व्यवसायात नाविन्यता आणून ते समाजातील युवकांना आत्मसात करायला लावून वेगवेगळ्या आर्टिकल वर यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन व्यवसायात नव चैतन्य निर्माण करण्याबाबतही अशा अनेक विषयावर सकारात्मक चर्चा होऊन या दोन्ही संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी एकमेकाला इथून पुढे सहकार्य करण्याचे ठरले त्यानुसार गट तट न मानता समाजाचा जेथे योग्य प्रश्न उभारला जाईल त्यासाठी दोन्ही संघटना पुढे येऊन काम करतील एक समाज एक देश ही भूमिका घेणार असून यासाठी नाभिक ऐकता महासंघाचे सर्व सर्वा
भगवानराव बिडवे (अण्णा) यांनी आपली प्रतिक्रिया दिली मुळातच अल्प असलेला नाभिक समाज विखुरलेला आहे. गटातटाच्या राजकारणाने समाजाची प्रगती खुंटली आहे. समाज विकासासाठी सर्वांनी एकतेची भूमिका घ्यावी या दृष्टीने एकच ध्येय, एक विचार, समाज विकाससाठी एकत्र येण्याचा निर्धार! करू म्हणून स्वतःपासूनच सुरुवात करून त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे हा मेसेज समाजात नेते म्हणून स्वतः निर्णय घेतला व त्या दिशेने सर्व समाजातील घटक असा निर्णय घेतील आणि तो निर्णय समजासाठी परिवर्तनाची नांदी ठरेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. नाभिक आरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवदासजी फुलवळकर सर नाभिक आरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष किशोरजी गाडेकर यांनी दोन्ही नेत्यांचा मत ऐकून घेऊन हा निर्णय सर्व सभासदांना सदस्यांना सांगून या निर्णयास संमती देऊन हे कार्य जोमाने करण्याचे आश्वासनही या ठिकाणी दिले या भेटीदरम्यान नाभिक आरक्षण समितीचे,श्री धनराज सोनवणे ,दादासाहेब काळे.श्री हरीशजी राऊत,श्री प्रसादजी गड्डीनकर कू.अंजली प्रधान,श्री सचिन चित्ते दिव्य लोकप्रभा चे उपसंपादक श्री नितीन क्षीरसागर असे अनेकजण उपस्थित होते.