महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

संघर्षातुन प्रभावीशाली व्यक्तिमत्व-केशवराव पंडित

संघर्षातुन प्रभावीशाली व्यक्तिमत्व-केशवराव पंडित
-----------------------------------

गेवराई तालुक्यातील मूळ सिंदखेड गावातील रहिवाशी असलेले सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले श्री.केशव शेषेराव पंडित सर यांचा जन्म चाळीस वर्षे पूर्णत्वास होऊन आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी 41 वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार असुन या निमित्ताने त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचा गौरव आपण निर्भीडपणे मांडणार आहोत. खरतंर आयुष्यातील प्रत्येक माणूस आपली जबाबदारी आपले कर्तव्य म्हणून कार्य करत असतो व समाजाला दिशा मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असताना आणि सामान्यात सहभागी कायम राहून सुखदुःखात एकमेकांना समजून घेत सहभागी  व्हावं लागेल हा विश्वास त्यांच्या संवादतुन एकरूप करुन सदैव सोबत राहुनच, आपुलकीचे, विश्वसनीय एक नातं निर्माण करणं हाच ध्यास जोपासत संघर्षातुन प्रभावीशाली व्यक्तिमत्व म्हणून असा ठसा केशवराव पंडित सर यांनी उमटविला आहे.


कार्यक्षम, अभ्यासू वृत्ती या बळावर बँकिंग क्षेत्रात काम करण्याची संधी त्यांना मिळाली त्या अनुभवातुन यशार्थ घेऊन बँकिंग क्षेत्रात उतरवण्याचा निश्चय त्यांनी केला. श्री. चिंतेश्वर संस्थांचे मठाधिपती दिलीप (बाबा) घोगे यांच्या आशीर्वादाने व सहकारी मित्रपरिवार यांच्या मदतीने यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी श्री .मंगलनाथ अर्बन मल्टिपल निधी लि. माध्यमातून त्यांनी वेळोवेळी ग्राहकांचा विश्वास उज्वल देखील केला .लहान-मोठ्या  सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी सर्वांच्याच हक्काचे केशव( अण्णा )म्हणून सर्व पराजित असलेलं नेतृत्व म्हणून सिद्ध झालं असुन अडचण कुठलीही असो ते त्यांचं तत्परतेने सोडवणारे, व शेवटपर्यंत साथ देणारे, त्यांच्या नेतृत्वात मायेचा ओलावा आहे..कुठलाही विजय प्राप्त करण्यासाठी अथक परिश्रम शिवाय पर्याय नाही हा विचार तर त्यांच्या मनात असल्यामुळे या परिश्रमातून गढी व सिरसदेवी इथे शाखा विस्तार केलेल्या आहेत विशेष म्हणजे पृथ्वीतलावर अवतरणारे व्यक्ती देवाच्या दूत बनून येतात. मानवी कर्माच्या मर्यादा ओलांडून चांगले काम करतात. यांची प्रचिती केशव अण्णांच्या रूपाने अनेक वेळा अनुभवलेले आहे. 

असो पुढे समाजकार्य करत असताना त्यांनी कोरोना काळामध्ये कोरोना रुग्ण समितीसाठी 45 बॅग रक्तदान संकलन केले.गावोगावी जागृती केली. गोरगरीब ग्राहकांना अन्नदान वाटप केले तसेच गरजूं रुग्णांना औषधाचे वाटप केले. पहिल्या लॉक डाऊन च्या काळात सर्वांना एक हजार मास्कचे वाटप करण्यात आले होते. नवरात्रीच्या काळात गेवराई शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त व हिंदू जनजागृती मंचाच्या सहकार्याने शालेय विद्यार्थिनी व विद्यार्थी तसेच महिला आजच्या परिस्थितीची जाणीव व्हावी म्हणून जागर नारी शक्तीचा कार्यक्रम याआधी आयोजित केले यामध्ये दांडिया स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा असे अनेक स्पर्धेचे आयोजन केले .खरंतर केवढे उत्तुंग व्यक्तिमत्त्व त्याचं. त्याहूनही अधिक उत्तुंग यश मिळवूनही ते किती नम्र असतात आपणही अण्णांचा आदर्श घेतला पाहिजे म्हणून हे मी लक्षात घेऊन कामावर जास्त फोकस करत असतो सचोटी,प्रामाणिकपणा, नम्रता आणि कृतज्ञता यात शब्दकोशातून अण्णाचे ध्येय उंच भरारीचा एक अध्याय सुरू हे निश्चित . संत- महंत यांच्या आशीर्वादाने व मान्यवरांच्या सहकार्याने शुभेच्छांच्या बळावर श्री .मंगलनाथ अर्बन संस्थेने 41 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार आत्तापर्यंत झाला आहे हा योगायोगच म्हणावा लागेल कारण की 10 फेब्रुवारी होणारा वाढदिवस त्यांचा 41 वा आहे म्हणून हा योग एका चांगल्या माणसाच्या नशिबी जुळतो हे तितकेच खरे आहे. त्यांनी केलेला ग्राहकांचा विश्वास संपादन मनोकामना मंगलमय भविष्याचे याच ब्रीदवाक्यातून श्री मंगलनाथ अर्बन सहकार सेवेत परिपूर्ण विश्वासाचे माहेरघर बनला आहे अशा उत्कृष्ट आणि अप्रतिम कार्यामुळे  सहकार क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे अशा संघर्षाच्या मुशीतून आपला आदर्श निर्माण करणारे श्री मंगलनाथ अर्बनचे चेअरमन श्री. केशव पंडित सर यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच भगवान श्री.चिंतेश्वर चरणी प्रार्थना करतो.

लेखक शुभम घोडके (उपसंपादक)