आष्टीत डॉ.जलाल महाराज सय्यद,डॉ.संजय कळमकर यांची व्याख्याने आणि महावीर रत्न पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न..
आष्टी प्रतिनिधी भगवान महावीर स्वामी जयंती निमित्त आष्टी, जि.बीड येथे सकल जैन समाज,आष्टी आयोजित कीर्तन,प्रवचनकार डॉ.जलाल महाराज सय्यद,आणि प्रसिद्ध
साहित्यिक,महाराष्ट्रातील खळखळून हसवणारा वक्ता,डॉ.संजय कळमकर यांचे अनुक्रमे दिनांक 09,आणि 10 एप्रिल 2025 रोजी आष्टी, आनंदऋषी महाराज चौक,कापड बाजार येथे अरे माणसा माणसा आणि जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.या कार्यक्रमात डॉ.मधुकरराव हंबर्डे यांना भगवान महावीर रत्न पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.भगवान महावीर स्वामी जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानांचे आयोजन करण्याची ही अनेक वर्षाची परंपरा असून,महाराष्ट्रातील अनेक थोर व्याख्यात्यांनी आजवर हजेरी लावली होती.उपस्थित श्रोत्यांनी दोन्ही व्याख्यानाचा लाभ घेतला.कार्यक्रमासाठी माजी आमदार साहेबराव दरेकर नाना,माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुरेश आण्णा धस,सेवानिवृत्त जिल्हाधिकारी तथा आयुक्त सुनील चव्हाण,प्रतिष्ठित नागरिक,व्यापारी, शिक्षक,वकील,डॉक्टर यांनी उपस्थित राहून व्याख्यानाचा आस्वाद घेतला.पहिल्या व्याख्यान पुष्पाचे सूत्रसंचालन डॉ.हरीश हातवटे, तर दुसऱ्या दिवसाचे सूत्रसंचालन कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी केले.आष्टी सकल जैन समाजाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.