सुवर्ण क्षणाची सोबती म्हणजे भाग्यलक्ष्मी लॉन्स...
आयुष्यात प्रत्येक क्षण नव्याने येऊन जातो. अशा क्षणांची बेरीज म्हणजे आयुष्य. रोजच उगवणारा व मावळणारा सूर्य तोच असला तरीही त्याच्या आगमन निर्गमनामुळे माणसाच्या दैनदिन जीवनात बदल हा होताच असतो, जन्मदिवस, लग्न, मुंज, नोकरी, व्यावसायिक आरंभ अशा आनंददायी गोष्टींना माणसाच्या आयुष्यात फार महत्व आहे. या घटनांच्या आठवणी जपणं मनाला कायम भावतं. आपल्या आयुष्यात समारंभ भव्य असावेत असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परिस्थितीप्रमाणे कुणी खर्चाला मुरड घालतं तर कुणी सढळ हाताने खर्च करत सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतात. तरीही दोन्ही स्वभावाच्या माणसांना हे सर्व किफायतशीर खर्चात व्हावं असं वाटतं. असा पर्याय शोधताना तो जवळच सापडला तर किती छान ना ! होय,तुमच्या भाग्याचे सौख्य अधिक सुखाचे ,आठवणींचा सुगंध देणारे ठरावे यासाठी एक उत्तर आहे. गेवराई शहरातील भाग्यलक्ष्मी लॉन्स या नावाने किशोर जाधव उच्च शिक्षित तरूणाने नोकरी न निवडता , रोजगार निर्मिती संधी व भाग्याचे क्षण अधोरेखित करण्यासाठी नव्या व्यवसायाची वाट धरली आहे. किशोर जाधव हे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अरूण जाधव व सौ.शोभा जाधव याचे जेष्ठ चिरंजीव आहेत.
भाग्यलक्ष्मी लॉन्सच्या माध्यमातून जाधव कुटुंबाने नव्या व्यवसायात पदार्पण केले आहे. कुठलाही व्यवसाय अचानक उभा राहत नसतो. त्यामागे कष्टाची, नियोजनाची व स्वप्नांची साखळी असते. अरूण जाधव यांचा पिंड मुळातच समाजसेवी आहे. त्यांच्या कार्याची व स्वभावाची दखल घेत त्यांना लोकांनी तलवाडा जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून देत बीड जिल्हा परिषद सभागृहात पाठवले. राजकारण व सत्ता हा जाणीवपूर्वक निवडलेला मार्ग नव्हता तो जनतेच्या लोका ग्रहास्तव चालून आलेला संधी शोध होता. राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रणी असताना अरूण जाधव यांना अनेक विवाह, वाढदिवस, सत्कार, परिषदा इत्यादी कार्यक्रमास जावे लागते. गेवराई, तलवाडा परिसरातील अनेक साधारण कुटुंब शिर्डी, पुणे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाऊन विवाह वा इत्यादी समारोह करत असत. हे सगळं पाहत असताना जाधव साहेबांच्या डोक्यात आपल्याच भागात असे एखादे सुंदर मंगल कार्यालय उभे केले तर हा विचार मनात गोंधळ घालू लागला.
शिर्डी, पुणे, छत्रपती संभाजीनगर भागातील मंगल कार्यालयातील खर्चापेक्षा कमी पैशात आपल्या गेवराई शहरातच असे एखादे छानसे मंगल कार्यालय उभे केले तर ? किती सुविधा देता येईल आणि स्थानिक तरूणांनाही रोजगार मिळेल हा विचार त्यांच्या मनी पेटला. भाग्यलक्ष्मी लॉन्सच्या माध्यमातून नवं स्वप्न घेऊन आपण काहीतरी वेगळं करू हा विचार अरूण जाधव यांनी कुटुंबात मांडला. अरूण जाधव यांना सुख दुःखात साथ देणारी, त्यांची अर्धागिनी सौ.शोभाताई जाधव यांच्या रूपाने साजेशी सहचारिणी लाभलेली आहे. शोभाताईंचे वडील सेवानिवृत्त स्व.नायब तहसिलदार तुळशीराम गायकवाड भाग्याची लक्ष्मी म्हणत असे, माहेरात व सासरी दोन्ही ठिकाणी त्यांनी भाग्य लक्ष्मी शब्दाला सार्थ करून दाखविले आहे. भाग्यलक्ष्मी लॉन्सची कल्पना शोभाताईंनी लगेच उचलून धरली व आपल्या मुलाने म्हणजेच किशोर याने नवी वाट धुंडाळत नवीन जबाबदारी पेलण्याची तयारी दाखविली अन् सुरू झाला एका नव्या पर्वाचा नव्या स्वप्नाचा प्रवास, आईच्या भाग्य पावलांना साक्ष म्हणून लॉन्सचे नाव ठेवले भाग्यलक्ष्मी लॉन्स.
गेवराई शहर धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, पुणे , मुंबई, नाशिक असं राज्यातील अनेक महत्त्वपूर्ण शहरांना ते थेट जोडलेलं आहे. त्यामुळे बाजारपेठ दृष्टीने गेवराई शहर झपाट्याने वाढत आहे. मुख्य बाजारपेठेपासून जवळच असलेला कोल्हेर रोड हा परिसर झपाट्याने वाढत आहे. त्याच रोडवर अरूण जाधव यांचे भाग्यलक्ष्मी लॉन्स आहे. भोवताली हिरवीगार शेती असल्यामुळे निसर्गाच्या कुशीचं नादत असणारे भाग्यलक्ष्मी लॉन्सला लाभलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी पार्किंगची गैरसोय होते. भाग्यलक्ष्मी लॉन्स भविष्याचा वेध घेऊन बांधलेले असलेले असल्यामुळे इथं तब्बल दोन एकर जागा फक्त पार्किंगसाठी आहे. अर्धा एकर सर्व सुविधायुक्त प्रशस्त हॉल ,अर्धा एकर देखणी लॉन्स. स्वतंत्र रूम, भरपूर पाणी,खेळती हवा असं हे टुमदार ठिकाण आहे. बाहेरगावी मोठ्या शहरात जाऊन अधिकचा वेळ व वित्त खर्च करणारांसाठी वाजवी दरात तिकडच्या सेवा इथं उपलब्ध आहेत. शिर्डी पुणेच्या धर्तीवर इथं सिल्वर, गोल्डन, डायमंड पॅकेज सिस्टिम आहे.
सर्व सुख सोयींनी युक्त असलेल्या भाग्यलक्ष्मी लॉन्स ची सुरुवात भागवत समारोहाने झाली आहे. या लॉन्समुळे केटरर्स, आचारी, डेकोरेश कलाकार, राखणदार, कामगार , बॅंड, फेटेवाले, फुलवाले, गायन वादन कलावंत, अक्षदा निर्मिती विक्री यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. हळदीकुंकू,मुंज, वाढदिवस, सत्कार समारोह, कंपनी मीटींग, सेमिनार यांसारख्या छोट्या कार्यक्रमासाठी सर्व सुविधा युक्त स्वतंत्र हॉल आहे. आयुष्यातील आठवणीत राहणाऱ्या क्षणांना कायम सुगंधी करण्यासाठी भाग्यलक्ष्मी लॉन्स हा एक उत्तम पर्याय आहे.आपण हि या भाग्यलक्ष्मी लॉन्सची सेवा अनुभवावी. आपल्या सर्वांच्या सहकार्याने एका तरूण उद्योजकाच्या स्वप्नांना बळ येईल. याच बरोबर अरुण जाधव व शोभाताई यांचे लहान चिरंजीव केतन जाधव हे शांत व सुसंस्कारी आणि IIT इंजिनिअर आहेत ते सध्या बंगलोर याठिकाणी कार्यरत आहेत. आपल्या कार्याची दाखल घेण्यासाठी आपण किशोर जाधव ९७६५४४४४३० यांना भेटून किंव्हा संपर्क करून आपल्या कार्याची नोंद या भाग्यलक्ष्मी लॉन्स देवू शकतात.
श्री. प्रवीण गंगाधर कुलथे
उपसंपादक साय. साप्तहिक प्रकाश आधार
९४२१४४१७८२ / ९०८२७६५६०९