जेष्ठ पत्रकार काझी हयातुल्ला यांचे निधन
गेवराई , (प्रतिनिधी ) - धनगर गल्ली येथील रहिवासी तथा गेवराई तालुक्यातील जेष्ठ पत्रकार काझी हयातुल्ला यांचे शनिवार रोजी सायंकाळी ५. ३० वाजता वृध्दपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९० वर्ष होते .त्याच्यावर रविवार रोजी सकाळी ९ वा शहरातील मोमीनपुरा येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात येणार आहे.त्याच्या पश्चात तीन मुले,दोन मुली, सुना,जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.काझी हयातुल्ला यांनी विविध वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केले होते.पत्रकार काझी अमान यांचे ते वडिल होते .