भगवंताच्या स्मरणात सुख शांती व आनंदाचा मार्ग मोकळा होतों ह.भ.प. श्रीहरी महाराज रसाळ
----------------------------------------
श्री.सिद्धेश्वराच्या पावन भूमीत शिव कथेत शंभु -पार्वती यांचा विवाह सोहळ्यात प्रतिपादन
गेवराई [ शुभम घोडके]
शिव आणि शक्ती अनादी कालापासून ह्या ब्रम्हांडाच्या उत्पत्ती स्थिती आणि लय या तिघांचे साक्षीदार आहेत. कथेमध्ये शिव पार्वती विवाह समारंभ प्रसंगी सज रहे भोले बाबा निराले दूल्हे थे या भजनांवरती सर्वांनी नृत्य करून आनंद घेतला. शंभु -पार्वती विवाह समारंभात हिमालय पर्वत मेणा राणी, लक्ष्मीनारायण, ब्रह्मदेव, नारद महामुनी, तसेच भूतांची आणि नंदी व शंभू महादेव -पार्वती यांची सजीव आरस करण्यात आली. मंत्रघोषात मंगलाष्टका सादर करण्यात आले. सावता नगर येथे सुरू असणाऱ्या श्री शिव महापुराण कथेत चौथ्या दिवशी भव्य श्री शंभू महादेव -पार्वती विवाह सोहळा संपन्न झाला.
भव्य संगीतमय श्री शिव महापुराण कथा चालू असून यामध्ये चौथ्या दिवसाच्या कथेमध्ये शंभु महादेव-पार्वती यांचा विवाह सोहळा थाटात झाला. यावेळी शंभू महादेवाचा -पार्वतीचा पोशाख केलेल्या पात्रांनी उपस्थितांची मने वेधून घेतली. या कथेतील विवाह सोहळ्यासाठी पुरुषांसह महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शहरातील सावता नगर येथे भव्य संगीतमय श्री शिव महापुराण कथेची सुरुवात सिद्धेश्वर मंदिराजवळ सोमवार दि. 24 रोजी झाली असून कथा प्रवक्ते ह.भ.प. श्रीहरी महाराज रसाळ यांच्या मधुर वाणीतून शिवपुराण कथेतील भगवान शंभु महादेवाच्या अनेक आध्यात्मिक लिलाचे वर्णन केलें. या जीवनाचेच दुसरे नाव संघर्ष आहे. जीवनात संकटे येणं स्वाभाविक आहे. दु:खाचा अंध:कार दूर झाल्यानंतर सुख प्राप्ती होते. जीवनात सुख-दु:ख येतच असतात. यासाठीकोणताही परिस्थिती उद्भवल्यास घाबरण्याचे कारण नाही. कधी-कधी मनुष्य जेव्हा संकटांच्या कचाट्यात सापडतो तेव्हा तो परमेश्वराला विसरल्यानेच त्याच्यावर ही परिस्थिती ओढवलेली असते. तेव्हा तो दु:खी होतो आणि आपल्या नशीबालाच दोष देत राहतो. परमेश्वरालाच वाईट म्हणतो. माणसाच्या जीवनात जे सुख दु:खाचे प्रसंग येतात हा भाग्याचा दोष नसून त्याने केलेल्या कर्माचे फळ आहे त्यामुळे भगवंताच्या स्मरणात सुख शांती समाधान नांदत असते. शंभू महादेवांच्या कृपेने अनेकांच्या अडचणीचा सामना सहज सोपा झाला शिवपुराण या कथा श्रावणात सर्वात मोठी शक्ती आहे. भगवान शंभू महादेवाच्या भक्तीतून अनेक महिला मंडळ जिवापाड श्रद्धा ठेवतात असे प्रतिपादन ह भ प कथा प्रवक्ते श्री. हरी महाराज रसाळ यांनी व्यक्त केले.यावेळी परिसरातील महीला पुरुष लहान थोर मंडळींनीही अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा विवाह सोहळ्यामध्ये महिला व पुरुष बांधवांनी सहभाग घेतला. सकाळच्या सत्रातील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणास ही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असून ज्ञानेश्वरी पारायण व कथेची सांगता सोमवार दि. 31 मार्च रोजी होणार आहे. ह.भ.प. श्रीहरी महाराज रसाळ यांचे काल्याचे किर्तन होणार असून महाप्रसादने कथेची सांगता होणार आहे. या श्री शिव महापुराण कथेचा पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सर्व आयोजन कमिटीच्या वतीने वतीने करण्यात आले आहे.