महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

नांदेवाली येथे मच्छिंद्रगडाचा फिरता नारळी सप्ताह; २ एप्रिल

नांदेवाली येथे मच्छिंद्रगडाचा  फिरता नारळी सप्ताह; २ एप्रिल रोजी पुष्पवृष्टीने होणार प्रारंभ





तितंरवणी( वार्ताहर)
-----
 तालुक्यातील नांदेवाली येथे श्रीक्षेत्र मच्छिंद्रगड संस्थानचा ४७ वा वार्षिक फिरता नारळी सप्ताह मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे. वैकुंठवासी धोंडीराम महाराज यांच्या प्रेरणेने आणि ब्रह्मलीन संत निगमानंद महाराज यांच्या कृपा छत्राखाली, महंत स्वामी जनार्दन महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. २ एप्रिल रोजी संत, महंत, ब्रह्मवृंद आणि भाविकांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी कार्यक्रमाने सप्ताहाचा शुभारंभ होणार असून, ९ एप्रिल रोजी महंत स्वामी जनार्दन महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
नांदेवाली ही ब्रह्मलीन संत निगमानंद महाराजांची जन्मभूमी असल्याने येथे सप्ताहाला विशेष महत्त्व आहे. सप्ताहाच्या निमित्ताने पहाटे काकडा भजन, विष्णुसहस्रनाम, गीता पाठ, ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम महाराज गाथा भजन, रामायण कथा, प्रवचन, हरिकीर्तन, जागर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहात नामवंत प्रवचनकार व कीर्तनकार आपले विचार मांडणार आहेत. प्रवचनासाठी नवनाथ महाराज शास्त्री (भालगाव), महंत सुरेशानंद महाराज (शृंगारवाडी), महंत हनुमान महाराज शास्त्री (मिडसांगवी), महंत भानुदास महाराज शास्त्री (गोवळवाडा), महंत अतुल महाराज शास्त्री (तागडगाव), महंत उद्धव महाराज शास्त्री (नारायणवाडी), हनुमान चैतन्य शास्त्री (आळंदी) यांचे प्रवचन होणार आहे.
कीर्तनकारांमध्ये महंत ज्ञानेश्वर माऊली शिंदे (आळंदी), विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर), केशव आप्पा नामदास, महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज (नारायणगडकर), महंत कान्होबा महाराज (देहूकर, पंढरपूर), महंत महादेवानंद महाराज शास्त्री (भारती, पिंपळवंडी), महंत विठ्ठल महाराज शास्त्री (गहीनाथगड), महंत देविदास महाराज शास्त्री (नेवासा) यांच्या कीर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रामेश्वर महाराज शास्त्री यांचे रामजन्म निमित्त कीर्तन आणि रामायणाचार्य नंदकिशोर महाराज बोधेगाव यांचे तुळशी रामायण होणार आहे.
९ एप्रिल रोजी महंत जनार्दन महाराज मच्छिंद्रगड यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल. सप्ताहात खातनाम, गायनाचार्य, मृदंगाचार्य यांच्या संगीत भजनाचा आनंद भाविकांना घेता येणार आहे. मच्छिंद्रगड संस्थानचे विणेकरी, मृदंगाचार्य, तबला वादक, हार्मोनियम, झंडेकरी, तसेच असंख्य भाविक यावेळी उपस्थित राहणार आहेत.
सप्ताहाच्या निमित्ताने मच्छिंद्रगडाचे मठाधिपती महंत जनार्दन महाराज यांचे मच्छिंद्रगड ते नांदेवाली दरम्यान भव्य दिव्य मिरवणुकीने गावात आगमन होणार आहे. या मिरवणुकीत हालगी पथक, बँड, टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ओमसाई’ रथाचा समावेश असणार आहे तसेच यावेळी जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. या मिरवणुकीत कलशधारी महिला, लहान मुले, युवक, तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.आसे नियोजन करण्यात आले आहे.या सप्ताहात 
गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर, डॉ. न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री, गाथामूर्ती रामभाऊ राऊत, गोविंद महाराज, शुक्ल भारती महाराज, विवेकानंद शास्त्री, मसन्नाथ महाराज, नामदेव महाराज (माऊली फाटा), नारायण महाराज ढिकले, भीष्मप्रसाद शास्त्री, बाबागिरी महाराज, बाळकृष्ण सुडके महाराज, यशवंत महाराज मसने, श्रीरंगस्वामी महाराज, शंकर महाराज, तीर्थराज महाराज पठाडे, बालाजी महाराज, लक्ष्मण महाराज फड आदी संत महंत  भक्तिमय सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
नांदेवाली गावाला या सप्ताहाच्या निमित्ताने ‘प्रति पंढरपूर’ असे स्वरूप प्राप्त होत आहे. भाविक भक्तगण मोठ्या संख्येने सप्ताहात सहभागी होणार असल्याचे महंत जनार्दन महाराज यांनी सांगितले. नांदेवाली ग्रामस्थांकडूनही भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन  करण्यात आले आहे.