महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

हंबर्डे महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न

हंबर्डे महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न

आष्टी:
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ॲड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालय, आष्टी येथे कै. ॲड. बन्सीधर धोंडीबापू हंबर्डे यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. किशोर (नाना) हंबर्डे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आनंदराव धोंडे महाविद्यालय, कडा येथील प्रा. डॉ. दत्तात्रय नरसाळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अभय शिंदे व सूत्रसंचालन डॉ. रमेश भारुडकर यांनी केले. 

या स्पर्धेत राज्यभरातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धकांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच चालू घडामोडींवर आपली मते मांडली. यामुळे प्रेक्षकवर्ग मंत्रमुग्ध झाला. विद्यार्थ्यांच्या बोलण्यात आत्मविश्वास, अभ्यासू वृत्ती व समाजाभिमुख विचारांचे दर्शन घडले.
तसेच या कार्यक्रमाप्रसंगी ॲड. बी . डी. हंबर्डे समाजभिमुख उत्कृष्ट प्राध्यापक राष्ट्रीय पुरस्कार 2025 वितरित करण्यात आला. हा पुरस्कार डॉ. दत्तात्रय नरसाळे आनंदराव धोंडे महाविद्यालय कडा यांना प्रदान करण्यात आला. कै. बन्सीधर धोंडीबापू हंबर्डे यांनी आयुष्यभर शिक्षण प्रसाराच्या कार्याला वाहून घेतले होते. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर आपली वक्तृत्वकला सादर करण्याची संधी मिळते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

या वेळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ . जी.पी. बोडखे (धोंडे महाविद्यालय कडा), डॉ. आप्पासाहेब टाळके (भगवान महाविद्यालय आष्टी) व प्रा. जैनुल्ला पठाण (हंबर्डे महाविद्यालय आष्टी) उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांची नावे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे यांनी घोषित केले.विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके व प्रमाणपत्रे आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री किशोर (नाना) हंबर्डे  व सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.