महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

जनतेच्या मनात घर करणारा नेता संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व मनोज (तात्या) हजारे

जनतेच्या मनात घर करणारा नेता
====================
संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व मनोज (तात्या) हजारे

एका सामान्य घरातील मुलगा असलेल्या मनोज हजारे युवा नेतृत्व कार्यापर्यंत खडतर प्रवास निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे आमचे लाडके नेते मनोज तात्या हजारे यांची कार्यपद्धती पाहता आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याचे स्वाभिमाने उर भरून आल्याशिवाय राहात नाही. तात्यांनी आपला साधेपणा जपत, प्रत्येकाच्या मनात आपल्या नावाचं घर निर्माण केलं आहे. यासाठी प्रचंड कष्ट, त्याग, समर्पण या गोष्टींमधून तावून-सुलाखून आपलं वेगळं नेतृत्व सिद्ध करत आपल्या नावाची वेगळी छाप पाडली आहे. स्वर्गीय अमोल (भैय्या) गलधर यांच्या माध्यमातून गेवराईच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या विद्यार्थी शहराध्यक्ष म्हणून कार्य करण्याची संधी मिळाल्यानंतर यांची युवकांना सोबत घेऊन पक्ष व संघटन करण्याची बुलेट ट्रेन सुसाट सुटली आहे. तेव्हापासून समाजातील विविध घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोचविण्याचे कार्य केले आहे. याशिवाय लोकाहिताच्या कामास त्यांनी प्राधान्य दिले आहे. परंतु, खरी मदत कशी करायची असतें, हे त्यांनी समाजकारण करत राजकारणात पाऊल टाकल्यानंतर तालुक्यातील जनतेला दाखवून दिले आहे.अनेक मित्रांशी स्नेहपूर्ण संबंध निर्माण करून प्रत्येक माणसाला आधार देणारा, संकटालाही आपलाच करणारा तरुण ठरतोय . तात्यांवर अनेक संकट आले मात्र अद्याप ते डगमगले नाही.समाजकारणाच्या व राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी वेगळी ओळख तालुक्यात निर्माण केली आहे. या नेतृत्वातील काम करण्याची ऊर्मी आम्हा तरुण कार्यकर्त्यांना अचाट ऊर्जा देणारी आहे. त्यांनी तालुक्यात आजपर्यंत विविध क्षेत्रात घडवून आणलेली युवा क्रांती तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यात मोलाची ठरली आहे. 

मित्र मंडळाच्या वतीने रुग्णांसाठी रुग्णवाहिका देखील तात्यांनी सुरू केली ती रुग्णवाहिका 24 तास रुग्णसेवेसाठी उपलब्ध असतें रुग्णवाहिकेतून अनेक रुग्णांना सेवा देण्याचे काम तात्यांनी केला आहे तात्या,जनतेशी आपली जुळलेली भावनिक मायेची नाळ मी जवळून अनुभवली आहे. समाजासाठी काम करण्याची तळमळ आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करते. आजपर्यंत आपण कितीतरी दुःखात असणाऱ्या माणसांना आधार देवून सावरले आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत कित्येकांच्या फाटलेल्या संसारांना आधाराची ठिगळे लावली आहेत. आपण कायमच स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठीच जगत आलात. खरचं  सोपं नसतं‌ इतरांसाठी जगणं. सोपं नसतं इतरांच्या आनंदात आनंदी होणं. त्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं.. अगदी तुमच्यासारखं...!
समाजाच्या हितासाठी झटण्याची तुमची तळमळ आम्ही अगदी जवळून बघितली आहे. सकाळी लवकर सुरु होणारा तुमचा दिवस रात्री उशिरापर्यंत फक्त लोकांची कामे मार्गी लावण्यात घालवता. मग तो युवक आहे का वृद्ध आहे, याचा विचार तुमच्या मनात कधीच येत नाही. तात्या तुमची तळमळ असते प्रत्येकाला योग्य न्याय मिळण्यासाठी... यासाठी तुम्ही कधीही लढायला तयार असता. तात्या आपल्या रक्तात असणारी जिद्द आणि स्वाभिमानीपणा
कायमच आम्हाला अवाक् करत आला आहे. अखंड माणुसकीचा झरा जपणारं आपलं नेतृत्व कायम असणे हीच  गेवराई तालुक्याला गरज आहे. ‘मला मतांसाठी राजकारण करायचं नाही, तर लोकांच्या प्रश्नांसाठी लढायचं आहे. कोणावर अन्याय झाला, तर हा तात्या तुमच्यासाठी लढायला हजारदा तयार आहे,’ असं सांगणारा आजच्या राजकारणातला एकमेव नेता म्हणजे मनोज तात्या हजारे हे होय.आपलं अवघं आयुष्य या समाजासाठी खर्ची घातलेल्या आमच्या लाडक्या नेत्यांचा  वाढदिवस.... हा दिवस तुमचा आहे, या तालुक्यासाठी प्रामाणिकपणाने केलेल्या कर्तृत्वाचा आहे. तात्या आपणास या वाढदिवसाच्यानिमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा... शतायुषी व्हा..!!

लेखक -शुभम घोडके पत्रकार, गेवराई मो.8308390008