महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

गोदावरी मल्टीस्टेटची आर्थिक स्थिती भक्कम : चेअरमन प्रभाकर पराड सर

*गोदावरी मल्टीस्टेटची आर्थिक स्थिती भक्कम : चेअरमन प्रभाकर पराड सर*

गेवराई प्रतिनिधी 
सभासद ठेवीदाराचा विश्वास जिंकणारी संस्था सन 2023 पासून बीड जिल्ह्य़ातील व मराठवाडय़ातील सहकारी पतसंस्था, निधी व मल्टीस्टेट खेळातील पत्याप्रमाणे कोसळू लागल्या, त्यामुळे या संस्थेतील ठेवीदाराच्या ठेवी अडचणीत आल्या, ठेवीदारात भितीचे वातावरण तयार झाले. तसेच समाजातील काही मंडळी विविध संस्थेबद्दल अफवा पसरू लागले, त्यामुळे ठेवीदार संस्थाचे स्वच्छ व पारदर्शक काम  करते का नाही हे  न पाहता किंवा संस्थाचालक कडून माहिती न घेता पैसे काढून घेऊ लागले. सर्वच ठेवीदार एकाच वेळी पैसे मागत असतील तर कोणतीच संस्था  100% ठेवी परत करू शकत नाही. कारण संस्थेने ठेवीच्या 65% ते 70% कर्ज वाटप केलेले असते, ते कर्ज लगेच वसूल होत नाही. त्यासाठी 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागतो. पण सर्वच ठेवीदार रक्कमची मागणी करतात, त्यामुळे सर्व ठेवीदाराला एकाच वेळी संस्था पैसे देवू शकत नाही.  लगेच माॅर्केट मध्ये मॅसेज फिरतात मी आमक्या आमक्या मल्टीस्टेट, पतसंस्थेत गेलो पण मला पैसे मिळाले नाही, बघ बबा तुझी काही रक्कम असेल तर काढून घे. अशा पध्दतीने पैसे काढणाराची गर्दी वाढत जाते. सर्वांना एकाच वेळी पैसे मिळत नाही आणि संस्था अडचणीत येते. ठेवीदारांनी संस्थेत पैसे ठेवताना जसा विश्वास ठेवला तसाच काही कालावधीसाठी विश्वास ठेवून त्या संस्थेला सहकार्य केले तर कोणतीच संस्था अडचणीत येणार नाही.सर्व ठेवीदारांना रक्कम मिळेल संस्था पण अफवेपासून वाचेल. आज 19 फेब्रुवारी 2026 ची गोदावरी मल्टीस्टेट ची आर्थिक स्थितीगोदावरी मल्टीस्टेट ने आजपर्यंत 120 कोटी रू ठेवी पैकी 110.50 कोटी रू ठेव रक्कम सभासद ठेवीदारांना परत केली आहे संस्थेची ठेव देणे  - 9.50 कोटी रूपये त्यापैकी संचालक मंडळाची ठेव रक्कम  - 3.00 कोटी रू सभासद ठेवीदार यांना गोदावरी मल्टीस्टेट ला देणे ठेव रक्कम- 6.50 कोटी रू आहे. आज रोजी संस्थेचे येणे कर्ज  - 25.15 कोटी रूपये व संस्थेची गुंतवणूक व मालमत्ता  - 14.50 कोटी रू आहे.  सध्या संस्था ठेवीदारांना कर्ज वसूली करून ठेव रक्कम परत करत आहे. त्यामुळे ठेवीदारांना एकाच वेळी रक्कम भेट नाही. त्यामुळे सभासद ठेवीदार यांनी संस्थेला सहकार्य करावे. संस्था प्रत्येक ठेवीदाराचा रूपया आणि रुपया परत करणार आहे.असा शब्द मी संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या वतीने देत आहे. संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे सर्व ठेवीदार, खातेदार व कर्जदार यांना विनंती की, पूर्वीसारखेच गोदावरी मल्टीस्टेट वर विश्वास ठेवून आपले दैनंदिन आर्थिक व्यवहार सुरू करावेत. आपल्या गोदावरी मल्टीस्टेट ला पूर्व वैभव प्राप्त करून द्यावे. 
जय सहकार सहकार टिकला पाहिजे ! असे माहिती गोदावरी मल्टीस्टेटचे चेअरमन प्रभाकर पराड सर यांनी दिली