महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

धोंडराईवर शोककळा; तरुण वैभव गुंजाळ याचे अपघाती निधन

धोंडराईवर शोककळा; तरुण वैभव गुंजाळ याचे अपघाती निधन
===================

गेवराई (प्रतिनिधी)
येथील प्रतिष्ठित नागरिक श्री. भारत मामा गुंजाळ यांचा तरुण मुलगा वैभव भारत गुंजाळ याचे आज अपघाती निधन झाले. या दुर्दैवी घटनेने धोंडराई गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभवचा अपघात अत्यंत भीषण होता, ज्यामध्ये त्याला आपले प्राण गमवावे लागले. एक उमदा, मनमिळावू आणि कष्टाळू तरुण म्हणून वैभवची गावात ओळख होती. ऐन उमेदीच्या काळात काळाने त्याच्यावर झडप घातल्याने गुंजाळ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या निधनाने एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.वैभवच्या पश्चात त्याचे आई-वडील, भावंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे. या कठीण प्रसंगातून सावरण्याची आणि हे अतीव दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर त्याच्या कुटुंबीयांना देवो, अशी प्रार्थना सर्वत्र केली जात आहे.वैभव भारत गुंजाळ याच्या पार्थिवावर  दि.२४ एप्रिल रोजी रात्री ९:३० वाजता धोंडराई येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे