सोमवार दिनांक १३ जुलै रोजी स्वामिनीस्ट नरवीर शिवाजी काशीद पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातील सलून्स बंद राहणार : प्रदेश अध्यक्ष सयाजी झुंजार
मुंबई प्रतिनिधी
सोमवार दिनांक १३ जुलै रोजी स्वामिनीस्ट नरवीर शिवाजी काशीद पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातील सलून्स बंद राहणार : सयाजी झुंजार प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांनी आव्हान केले आहे
प्रति वर्षाप्रमाणे 13 जुलै 2026 रोजी स्वामीनिष्ठ नरवीर शिवाजी काशीद यांची पुण्यतिथी पन्हाळगड येथील नेबापूर या गडाच्या पायथ्याशी शिवाजी काशीद यांच्या स्मारकावर अभिषेक करून करण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक मधून येणाऱ्या सर्व शिवप्रेमींचे स्वागत महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात येईल. प्रचंड पाऊस,वादळी वारे, सिद्धी जौहारच्या कडेकोट वेढ्यातून प्रति शिवाजी बनून त्याच्या वेड्यात घुसण्याचे धाडस शिवरत्न शिवाजी काशीद यांनी दाखवले होते.
शिवाजी महाराजांच्या सारखा हुबेहूब दिसणारा हा मावळा नाभिक समाजाचा ऐतिहासिक ठेवा आहे. इतिहासातील दोन घटना प्रतापगडावरील जिवाजी महाले आणि पन्हाळगडावरील शिवाजी काशीद यांच्या पराक्रमाचा इतिहास नाभिक समाजासह सर्वच शिवप्रेमींना प्रेमींना प्रेरणा देत असतो. १२ जुलै १६६० च्या मध्यरात्री सिद्धी जौहारच्या छावणीत शिवाजी महाराज म्हणून शिवाजी काशीद यांनी प्रवेश केला आणि त्याचवेळी दुसऱ्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे रवाना झाले, शिवाजी महाराजांची सिद्धी जोहरच्या त्या कडेकोट बंदोबस्तातून सुटका झाली. ज्यावेळी शिवाजी काशीद हा शिवाजी महाराज नाही हे सिद्धी जौहार, अफजलखानाचा मुलगा फाजलखान आणि संपूर्ण छावणीच्या च्या लक्षात आले त्यावेळी त्याच्या शरीराची तलवारीचे असंख्य वार करून शरीराची चाळन केली, मृत्यू समोर असताना सुद्धा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणत छत्रपतींना मुजरा करून स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. इतिहासातील 13 जुलै ही तारीख शिवाजी काशीद यांच्या बलीदाना ची तारीख आहे. स्वामिनीष्ठ नरवीर शिवाजी काशीद यांचे भव्य दिव्य स्मारक पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेबापूर याठीकाणी आहे,या ठिकाणी हजारो लोक या दिवशी शिवाजी काशीदांच्या स्मारकाच्या दर्शनासाठी येत असतात यानिमित्ताने महाराष्ट्रातील सर्व नाभिक समाज पन्हाळगड येथे अभिवादन करण्यासाठी एकवटतो. कोल्हापूरची लोकप्रिय खासदार शाहु छत्रपती महाराज यांच्या हस्ते समाधीवर दुग्धाअभिषेक सकाळी ९-३० वाजता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर पन्हाळा शाहूवाडी चे आमदार विनय कोरे सावकार यांच्या उपस्थितीत,समाज भुषण पुरस्कार वितरण,तरुण इतिहास अभ्यासक गौरव जाधव यांचे व्याख्यान, मर्दानी खेळ, उपस्थित समाज बांधवांना युवक संघटनेच्या वतीने अध्यक्ष मोहन चव्हाण आणि त्याच्या पदाधिकारी यांचे वतीने प्रसाद वाटप असणार आहे, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बाबासाहेब काशीद, जिल्हाध्यक्ष मारुती टिपूगडे, महिला जिल्हाध्यक्षा सौ मेघाराणी जाधव, पन्हाळा तालुका अध्यक्ष संजय रोकडे, पन्हाळा पोलिस पाटील भीमराव काशीद, रवी काशीद, प्रवीण काशीद यांच्यासह सर्व समाज बंधू भगिनी त्या दिवशी स्मारकावर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व शिवप्रेमींची काळजीपूर्वक व्यवस्था करतात.13 जुलै या दिवशी या परिसरात प्रचंड पाऊस असतो तेव्हा महाराष्ट्रातून येणाऱ्या शिवप्रेमींनी पावसापासून बचावासाठी स्वतःची व्यवस्था करावी असे आवाहनही यावेळी सयाजी झुंजार यांनी केले
