महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

दैव जाणिले कुणी 32 वर्षांपूर्वी हरवलेला 'प्रकाश' पुन्हा केकतपांगरी चमकला! ' जाधव कुटुंबात आनंद'

  दैव जाणिले कुणी 32 वर्षांपूर्वी हरवलेला 'प्रकाश' पुन्हा केकतपांगरी चमकला! जाधव कुटुंबात आनंद
 
गेवराई (विशेष प्रतिनिधी दैनिक महाभारत )

गेवराई तालुक्यातील केकतपांगरी येथील रहिवासी सन १९९३ मध्ये नाशिक मधून हरवलेला प्रकाश जनार्दन जाधव हा तरुण तब्बल ३२ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आणि अंगावर काटा आणणाऱ्या प्रवासानंतर आपल्या कुटुंबाला पुन्हा सापडला आहे. स्मृतीभ्रंशामुळे (Memory Loss) जगभर भटकंती केल्यानंतर, एका पत्राने जाधव परिवाराची ही ३२ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.
              प्रकाश जनार्दन जाधव ह्यांची कुटुंबिक माहिती अशी कि प्रकाश हे जनार्दन वाचू जाधव यांचे एकुलते एक पुत्र असून त्यांना चार बहिणी आहेत. त्यांचे वडील सुरुवातीला कंपनीत कामाला होते, परंतु कंपनी बंद पडल्यानंतर त्यांनी किराणा दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. तसेच त्यांचे मूळगाव केकत पांगरी ( हरीलाल नाईक तांडा ) ता.गेवराई जिल्हा बीड , प्रकाश जनार्दन जाधव यांचे काका श्री.छगन वाचू जाधव व भाऊ श्री.सुभाष जाधव आणि चार बहिणी व संपूर्ण नातेवाईक व गावकरी गेली अनेक वर्षे त्यांच्या प्रतीक्षेत होते.
             कथा स्मृतीभ्रंश आणि जागतिक प्रवासाची सुरुवात (१९९३)  नाशिक मधून घर सोडून गेल्यानंतर नाशिक मध्ये दोन महिने काम केल्यानंतर प्रकाश यांचा प्रवास सुरू झाला. पुढे दीड वर्ष गोवा आणि सहा महिने पुणे येथे त्यांनी वास्तव्य केले. घातामुळे स्मृतीभ्रंश (१९९६/९७) दिल्लीला जात असताना रेल्वेमध्ये त्यांच्यासोबत एक गंभीर घटना घडली ज्यामध्ये त्यांचे पैसे व सर्व साहित्य गेले ते बेहोश अवस्थेत दिल्ली मध्ये पोहोचले, ज्यामध्ये त्यांची स्मृती गेली. त्यानंतर त्यांनी एक वर्ष नेपाळ मध्ये काढले. त्यानंतर त्यांनी २० वर्षे दिल्ली आणि आंतरराष्ट्रीय प्रवास स्मृती गेलेली असतानाही त्यांनी दिल्लीत गुरु बहीण मनिषा करवाल यांच्या जवळ २० वर्षे काढली. त्यानंतर ते सिंगापूर (१.५ वर्ष ), रशिया (२ वर्षे), दुबई, अबुधाबी, शारजाह (२ वर्षे) आणि थायलंड (६ महिने) अशा विविध देशांत कामाच्या निमित्ताने फिरले. तेव्हा जगभरात कोरोना काळ आणि युरोप मध्ये देशात त्यांचे वास्तव्य करत त्यांनी कोरोनाच्या काळात दिल्ली मध्ये वास्तव्य नंतर दुबई आणि इस्तंबूल मार्गे ते थेट युरोप मधील माल्टा (Malta) येथे पोहोचले.
             प्रकाश जनार्दन जाधव यांचा शोध डिसेंबर २०२४ मध्ये माल्टा येथे प्रकाश यांना 'ब्रेन स्ट्रोक'चा (Brain Stroke) त्रास झाला. या धक्क्यामुळे त्यांची गेलेली स्मृती परत आली (Memory Return). त्यानंतर १६ एप्रिल २०२५ रोजी त्यांच्या बद्दलची माहिती असलेले पत्र त्यांचे काका श्री.छगन वाचू जाधव यांच्या नावाने केकत पांगरी येथे मिळाले त्या पत्राच्या आधारे काकांचा मुलगा श्री.सुभाष छगन जाधव यांच्याशी त्यांचा दूरध्वनीद्वारे संपर्क झाला, आणि वर्षांनंतर २० फेब्रुवारी २०२६ वार रविवार रोजी 'प्रकाश' पुन्हा आपल्या घरी परतणार असल्याने हरीलाल नाईक तांडा, रामूनाईक तांडा,लक्ष्मण नाईक तांडा,रामनगर तांडा केकत पांगरी गावात आणि जाधव परिवारात आनंदाचे वातावरण आहे, जीवन प्रवास हा सोपा नाही आणि त्यांचे १८ फेब्रुवारी २०२६ रात्री  ९ वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले, हे कळताच त्यांच्या मूळ गाव केकत पांगरी हरीलाल नाईक तांडा ता.गेवराई जि.बीड येथे प्रकाश जाधव ३२ वर्षानंतर पहिल्यांदाच भेटल्यामुळे त्यांचे भाऊ श्री.सुभाष जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचा  वाढदिवस मोठ्या थाटा माटात साजरा करण्यात आला.! जाधव कुटुंबात आनंद
 
गेवराई (विशेष प्रतिनिधी दैनिक महाभारत )

गेवराई तालुक्यातील केकतपांगरी येथील रहिवासी सन १९९३ मध्ये नाशिक मधून हरवलेला प्रकाश जनार्दन जाधव हा तरुण तब्बल ३२ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आणि अंगावर काटा आणणाऱ्या प्रवासानंतर आपल्या कुटुंबाला पुन्हा सापडला आहे. स्मृतीभ्रंशामुळे (Memory Loss) जगभर भटकंती केल्यानंतर, एका पत्राने जाधव परिवाराची ही ३२ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.
              प्रकाश जनार्दन जाधव ह्यांची कुटुंबिक माहिती अशी कि प्रकाश हे जनार्दन वाचू जाधव यांचे एकुलते एक पुत्र असून त्यांना चार बहिणी आहेत. त्यांचे वडील सुरुवातीला कंपनीत कामाला होते, परंतु कंपनी बंद पडल्यानंतर त्यांनी किराणा दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. तसेच त्यांचे मूळगाव केकत पांगरी ( हरीलाल नाईक तांडा ) ता.गेवराई जिल्हा बीड , प्रकाश जनार्दन जाधव यांचे काका श्री.छगन वाचू जाधव व भाऊ श्री.सुभाष जाधव आणि चार बहिणी व संपूर्ण नातेवाईक व गावकरी गेली अनेक वर्षे त्यांच्या प्रतीक्षेत होते.
             कथा स्मृतीभ्रंश आणि जागतिक प्रवासाची सुरुवात (१९९३)  नाशिक मधून घर सोडून गेल्यानंतर नाशिक मध्ये दोन महिने काम केल्यानंतर प्रकाश यांचा प्रवास सुरू झाला. पुढे दीड वर्ष गोवा आणि सहा महिने पुणे येथे त्यांनी वास्तव्य केले. घातामुळे स्मृतीभ्रंश (१९९६/९७) दिल्लीला जात असताना रेल्वेमध्ये त्यांच्यासोबत एक गंभीर घटना घडली ज्यामध्ये त्यांचे पैसे व सर्व साहित्य गेले ते बेहोश अवस्थेत दिल्ली मध्ये पोहोचले, ज्यामध्ये त्यांची स्मृती गेली. त्यानंतर त्यांनी एक वर्ष नेपाळ मध्ये काढले. त्यानंतर त्यांनी २० वर्षे दिल्ली आणि आंतरराष्ट्रीय प्रवास स्मृती गेलेली असतानाही त्यांनी दिल्लीत गुरु बहीण मनिषा करवाल यांच्या जवळ २० वर्षे काढली. त्यानंतर ते सिंगापूर (१.५ वर्ष ), रशिया (२ वर्षे), दुबई, अबुधाबी, शारजाह (२ वर्षे) आणि थायलंड (६ महिने) अशा विविध देशांत कामाच्या निमित्ताने फिरले. तेव्हा जगभरात कोरोना काळ आणि युरोप मध्ये देशात त्यांचे वास्तव्य करत त्यांनी कोरोनाच्या काळात दिल्ली मध्ये वास्तव्य नंतर दुबई आणि इस्तंबूल मार्गे ते थेट युरोप मधील माल्टा (Malta) येथे पोहोचले.
             प्रकाश जनार्दन जाधव यांचा शोध डिसेंबर २०२४ मध्ये माल्टा येथे प्रकाश यांना 'ब्रेन स्ट्रोक'चा (Brain Stroke) त्रास झाला. या धक्क्यामुळे त्यांची गेलेली स्मृती परत आली (Memory Return). त्यानंतर १६ एप्रिल २०२५ रोजी त्यांच्या बद्दलची माहिती असलेले पत्र त्यांचे काका श्री.छगन वाचू जाधव यांच्या नावाने केकत पांगरी येथे मिळाले त्या पत्राच्या आधारे काकांचा मुलगा श्री.सुभाष छगन जाधव यांच्याशी त्यांचा दूरध्वनीद्वारे संपर्क झाला, आणि वर्षांनंतर २० फेब्रुवारी २०२६ वार रविवार रोजी 'प्रकाश' पुन्हा आपल्या घरी परतणार असल्याने हरीलाल नाईक तांडा, रामूनाईक तांडा,लक्ष्मण नाईक तांडा,रामनगर तांडा केकत पांगरी गावात आणि जाधव परिवारात आनंदाचे वातावरण आहे, जीवन प्रवास हा सोपा नाही आणि त्यांचे १८ फेब्रुवारी २०२६ रात्री  ९ वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले, हे कळताच त्यांच्या मूळ गाव केकत पांगरी हरीलाल नाईक तांडा ता.गेवराई जि.बीड येथे प्रकाश जाधव ३२ वर्षानंतर पहिल्यांदाच भेटल्यामुळे त्यांचे भाऊ श्री.सुभाष जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचा  वाढदिवस मोठ्या थाटा माटात साजरा करण्यात आला.