अनुपमा पाटील यांच्या ‘रुजवा’ला तीन पुरस्कार; बेस्ट फिमेल डायरेक्टर, बेस्ट फिल्म स्टोरी आणि बेस्ट सिनेमाटोग्राफीचा बहुमान
गेवराई, प्रतिनिधी :
‘जिजाऊ फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत आणि अनुपमा भाऊसाहेब अलवने पाटील निर्मित ‘रुजवा’ या अवॉर्ड विनिंग मराठी लघुपटाने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वर्ल्ड सिनेमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल तसेच रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत ‘रुजवा’ लघुपटाने तब्बल तीन प्रथम क्रमांकाचे पुरस्कार पटकावून आपल्या कलाकृतीची प्रभावी छाप उमटवली आहे.
या यशामध्ये बेस्ट फिमेल डायरेक्टर – प्रथम क्रमांक (ऑल इंडिया) अनुपमा पाटील, बेस्ट फिल्म स्टोरी – प्रथम क्रमांक लेखिका अनुपमा पाटील आणि बेस्ट सिनेमाटोग्राफी – प्रथम क्रमांक रवी शिराळे या तीन पुरस्कारांचा समावेश आहे.
सामाजिक वास्तव मांडणारा संवेदनशील लघुपट
‘रुजवा’ हा केवळ मनोरंजन करणारा लघुपट नसून गरीब शेतकरी कुटुंबातील मुलीच्या शिक्षणासाठीच्या संघर्षाची आणि तिच्या आयुष्यात शिक्षणामुळे होणाऱ्या परिवर्तनाची प्रभावी कथा मांडणारी सामाजिक आशयाची कलाकृती आहे. मुलीचा संघर्ष, स्त्री सन्मान, शिक्षणाचे महत्त्व, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास या संवेदनशील विषयांना लघुपटातून प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले आहे.
शिवराय, जिजाऊ आणि सावित्रीबाईंच्या विचारांचा जागर
छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी विचारांसह भारतीय संविधानातील समानता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ‘रुजवा’
