महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

गेवराईचे श्री संत सेनाजी महाराज मंदिर ट्रस्ट कार्यकारणी सदस्यांची नेवासा येथील विविध मंदिरांना भेट

गेवराईचे श्री संत सेनाजी महाराज मंदिर ट्रस्ट कार्यकारणी सदस्यांची  नेवासा येथील विविध मंदिरांना भेट



अहिल्यानगर  (स्वप्निल शिंदे  जि प्रतिनिधी ) :संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचे लेखन ज्या पवित्र पैसखांब येथे केले, त्या श्रीक्षेत्र नेवासा येथे गेवराई तालुक्यातील नाभिक समाजाच्या मान्यवरांनी संत शिरोमणी सेनाजी महाराज मंदिरास सदिच्छा भेट दिली. यावेळी मंदिर परिसरातील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांची माहिती जाणून घेत संत परंपरेला अभिवादन करण्यात आले.
संत शिरोमणी सेनाजी महाराज मंदिर ट्रस्ट, गेवराईच्या कार्यकारिणीने विविध मंदिरांना भेटी देत धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. या भेटीमध्ये गेवराई तालुका नाभिक समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक कॅप्टन शंकरराव सूर्यवंशी, संत सेना महाराज मंदिर गेवराई ट्रस्टचे अध्यक्ष तथा पत्रकार-संपादक श्री. सुनीलराव पोपळे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य श्री. तुळशीराम आतकरे महाराज, संत सेना महाराज मंदिराचे पुजारी ह.भ.प. राजेंद्र महाराज पंडित, तसेच नेवासा मंदिर समितीचे ह.भ.प. सचिन महाराज पवार  आप्पासाहेब गायकवाड यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संत सेना महाराजांच्या कार्याचा व संत परंपरेचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. विविध मंदिरांच्या कार्यपद्धतीची माहिती घेत धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.त्यानंतर नेवासा फाटा येथील श्रीराम साधना आश्रमास मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. परमपूज्य महत सुनीलगिरीजी महाराज यांच्या अधिपत्याखालील या आश्रमाला भेट देऊन धार्मिक व सामाजिक कार्याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. यावेळी गायनाचार्य श्री. तुळशीराम आतकरे महाराज, ह.भ.प. राजेंद्र महाराज पंडित, पत्रकार तथा ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सुनीलराव पोपळे,  गेवराई तालुक्याचे जेष्ठ मार्गदर्शक कॅप्टन शंकरराव सूर्यवंशी यांच्यासह नेवासा फाटा येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनंतराव औटी उपस्थित होते. आश्रमाच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक डॉक्टर तुळशीराम आतकरी महाराज यांनी त्यांनी केलेल्या दोन भजने या आश्रमात सादर केले या सदिच्छा भेटींमुळे संत परंपरा, अध्यात्म आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. संतांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी तसेच धार्मिक व सामाजिक कार्याला चालना देण्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.