"संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव बापू मडके यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण; 'एकही पात्र लाभार्थी वंचित राहू देणार नाही' अशी ग्वाही"
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार व संपर्कप्रमुख मनोजदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई तालुक्यात शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प
गेवराई | प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या लोककल्याणकारी विचारांना अनुसरून तसेच शिवसेना संपर्कप्रमुख मा. मनोजदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई तालुक्यात शासनाच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेना सातत्याने कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आगरनांदूर येथे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव बापू मडके यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यावेळी लाभार्थ्यांमध्ये गीता श्रीमंत कोकरे, बबती त्र्यंबक आरेकर, नानीबाई आण्णा आरेकर, अहिल्याबाई कल्याण कोकरे, कांताबाई शिवाजी कोकरे, सविता रंजित कोकरे, छबुबाई सुदाम जाधव, शांताबाई तात्याराव मोटे, सुरेखा चव्हाण (ताकडगाव) आणि शशिकला जयसिंग टकले यांचा समावेश होता. लाभार्थ्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत शिवसेनेच्या पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या सदस्या सौ. शंकूताई घुंगासे, चंद्रकला मुळे तसेच शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
याप्रसंगी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव बापू मडके म्हणाले,
"मा. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की, शासनाच्या कोणत्याही लोककल्याणकारी योजनेपासून एकही पात्र नागरिक वंचित राहता कामा नये. संपर्कप्रमुख आदरणीय मनोजदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई तालुक्यातील प्रत्येक निराधार, विधवा, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व गरजू नागरिकांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. प्रत्येक गावात जाऊन पात्र लाभार्थी शोधणे, त्यांचे प्रस्ताव तयार करणे आणि त्यांना शासनाचा लाभ मिळवून देणे हे आमचे कर्तव्य असून, गेवराई तालुक्यातील एकही पात्र लाभार्थी यापुढे वंचित राहू देणार नाही. शासनाच्या सर्व योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही."
यावेळी उपस्थित महिलांनीही उद्धव बापू मडके यांच्या कार्याबद्दल विश्वास व्यक्त करत, "गरजू व निराधार कुटुंबांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असून, प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत शासनाचा हक्काचा लाभ पोहोचविण्याचे कार्य ते प्रामाणिकपणे करत आहेत," अशा भावना व्यक्त केल्या.
या उपक्रमामुळे आगरनांदूर परिसरातील अनेक गरजू महिलांना संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, गेवराई तालुक्यातील कोणताही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून विशेष जनजागृती, मार्गदर्शन व पाठपुरावा अभियान अधिक व्यापकपणे राबविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
