महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

पहिला पगार समाजाला, आणि आता दैनिक सम्राटला डॉ. सुजित उत्तम हजारे यांचा समाजापुढे आदर्श

*पहिला पगार समाजाला, आणि आता दैनिक सम्राटला*

--- डॉ. सुजित उत्तम हजारे यांचा समाजापुढे आदर्श

बीड , ( प्रतिनिधी) बीड येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांचा मुलगा डॉ. सुजित हजारे यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर, मिळालेला पहिला पगार हा बीड येथील शिवणीच्या धम्मभूमीसाठी दिला. तर  दि.१५ ऑगस्ट रोजी आपल्या वाढदिवसा निमित्त सम्राटच्या मुंबई कार्यालयात येऊन, पाच हजाराची देणगी दै. वृत्तरत्न सम्राटचे कार्यकारी संपादक कुणालजी कांबळे यांच्याकडे सुर्पूर्द केली.

      बीड येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांचा मुलगा डॉ. सुजित हजारे यांनी लातूर येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अहमदनगर जिल्ह्यात पहिला जॉब केला. पूज्य भन्ते धम्मशील थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली शिवणी, ता. बीड येथे सुरू असलेल्या धम्मकार्याला डॉ. सुजितने पहिला पगार दान दिला. दि.१५ ऑगस्ट रोजी डॉ. सुजितचा वाढदिवस असून, या निमित्ताने दैनिक वृत्तरत्न सम्राटला पाच हजार रुपायांची देणगी दिली. यावेळी कार्यकारी संपादक कुणालजी कांबळे सर, पत्रकार उत्तम हजारे, प्रियांका हजारे, डॉ. सुजित हजारे, नक्षत्रा हजारे यांच्यासह सम्राट कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.


---------- ---------