सांस्कृतिक कार्यक्रमातून कलागुणांना वाव मिळतो - नगराध्यक्षा गिताभाभी पवार
शानदार समारंभात बक्षिस वितरण
गेवराई प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात सांस्कृतिक कार्यक्रमाल अनन्यसाधारण महत्त्व असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यामुळे, सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे. असे प्रतिपादन गेवराई च्या नगराध्यक्षा गिताभाभी बाळराजे पवार यांनी येथे बोलताना केले. बुधवार ता. 18 रोजी, वार बुधवार, भगवती टॉकीज परिसराच्या मैदानावर, गेवराई नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक महोत्सवात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर बाळराजे पवार, नायब तहसीलदार संजय सोनवणे , जिपचे माजी सभापती युद्धाजीत पंडित, पोलिस निरीक्षक किशोर पवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, उपाध्यक्षा रेवती घुंबार्डे, गटनेते ॲड. राजेंद्र राक्षसभुवनकर, माजी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, सभापती महेश सौंदरमल, सभापती बद्दुशेठ, नपचे सभापती शहेदाद भाई, उपसभापती सोनाली सुतार, नगरसेवक राजेश टाक, नगरसेविका अंकिता धोंडलकर, सभापती प्रशांत राख, नगरसेवक शिनुभाऊ बेदरे, राजाभाऊ आर्दड, नगरसेवक आबासाहेब काकडे, माजी नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ, उपाध्यक्ष दादासाहेब गिरी यांची उपस्थिती होती. नगराध्यक्षा गीताताई पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, नगर परिषदेच्या स्वच्छता अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनी ही शुभेच्छापर संदेश दिला. नप ने आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवात विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून, बहारदार अभिनयातून लक्षवेधी कलाकृती सादर करून रंगमंचावर धमाल केली. बुद्धिबळ स्पर्धा निकालात प्रथम- संस्कार सिद्धार्थ नरवडे, चिन्तेश्वर प्राथ विद्यालय, द्वितीय - शिवतेज दिनेश औटे, केंब्रिज आय स्कूल ,प्रथम - प्राची प्रशांत राऊत
केंब्रिज आय स्कूल, द्वितीय - सिद्धी उमेश चौडिया, तुळजा भवानी स्कूल,
प्रथम - अश्विन मच्छिद्र दहीवाळ
विमला माध्यमिक विद्यालय,द्वितीय- रणवीर तुळशिराम सोळंके ,केंब्रिज आय स्कूल, प्रथम - विद्या शिवप्रसाद पोपळघट, सेंट झेवियर्स स्कूल ,द्वितीय - काव्य अमोल कनपुरे याने बाजी मारून यश संपादन केले.चित्रकला स्पर्धेत
प्रथम -अक्षरा राजेंद्र राठोड, सेंट झेवियर्स स्कूल,द्वितीय- महेश मधुकर तौर, शारदा विद्यामंदिर ,तृतीय- ओवी प्रवीण वावरे, केंब्रिज आय स्कूल,
प्रथम-महिमा लक्ष्मण सोनावणे, सेंट झेवियर्स स्कूल, द्वितीय - आराध्य अप्पासाहेब चव्हाण, केंब्रिज आय स्कूल,तृतीय-श्रुतिका लहू म्हेत्रे, विमला माध्यमिक विद्यालयाला मिळाले.रांगोळी स्पर्धेत प्रथम-सानिका आखरे, केंब्रिज आय स्कूल, द्वितीय-वैष्णवी राम सोळंके,चिंतेश्वर प्रा विद्यालय ,तृतीय-आरोही प्रशांत जाधव,विमला विद्यामंदि,प्रथम-
गौरी दादासाहेब खडके,विमला माध्यमिक विद्यालय ,द्वितीय-प्राजक्ता अशोक कादे ,कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ,तृतीय-आदिती महादेव पांचाळ,सेंट झेवियर्स स्कूल गेवराई यांचा नंबर आला.वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम-
मोमीन अहमन आत्तार, मिल्लत इंग्लिश स्कूल,द्वितीय -ईश्वरी रामेश्वर भुते,तुळजा भवानी इंग्लिश स्कूल,
तृतीय-तृप्ती संभाजी नरवाडे,केंब्रिज आय स्कूल , माध्यमिक गटातून
प्रथम- प्रियांशु रविकांत लाड,सेंट झेवियर्स स्कूल,द्वितीय- मनस्वी दिनकर शिंदे,सेंट झेवियर्स स्कूल,
तृतीय- नेहा रमेश म्हस्के, केंब्रिज आय स्कूल गेवराई हिने बाजी मारून यश संपादन केले.शोभायात्रा व पथसंचालनात जि. प कन्या प्रशाला गेवराई शाळेला प्रथम क्रमांक मिळाला.न्यू इरा इंग्लिश स्कूल गेवराई या शाळेला द्वितीय तर केंब्रिज आय स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला आहे.चॅम्पियन्स संघ म्हणून सेंट झेवियर्स स्कूल गेवराई यांना , उपविजेता संघाचा मान द केम्ब्रिज व्हली इंटरनशनल स्कूल गेवराईला देण्यात आला. कार्यक्रमाचे परिक्षण प्रकाश भुते , प्रशांत रूईकर, दिनकर शिंदे, सुशिल टकले, अंजली खोबरे, अमित गाडे यांनी केले. सूत्रसंचालन श्याम वादे, प्राची दरडे यांनी केले. कार्यक्रमास
