आदरणीय शास्त्रीजी - हार्दिक अभिस्टचिंतन.....
आदरणीय शास्त्रीजी - हार्दिक अभिस्टचिंतन.....ज्ञानेश्वरी म्हणजे कैवल्याचं लेणं पंढरीच्या वाटेवर शतकानू शतके दीपस्तंभासारखे सदैव प्रकाशाचे डोह उजळीत प्रेरणांच्या प्रवाहांना वाट दावणारे .जीवनाचे वैपरीत्य सज्जनांना सतत कोड्यात टाकनारे वैपरीत्याची सांगड विवेकाशी घालावी तरी कशी .निष्काम सेवा भक्ती समर्पण असं काही तुमच्याकडून काही त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी ते जाणले तर देव आपल्याला सुखाचा सागर देतील ज्ञानेश्वर माऊलीचे पसायदान म्हणजे विश्वात्मक देवाजवळ केलेली प्रार्थना आहे सर्वांना सर्व काही लाभू दे ज्याला जे जे हवे ते ते मिळू दे अशी भावना केवळ ज्ञानेश्वर माऊलीच करू शकतात पण ही उदात्तता जाणण्याचा इष्टनिष्ठतेचा विवेक लोभी आणि आत्मकेंद्रीत लोकाकडे असतो कुठे माऊलींनी यासाठी पूर्व सूचना केली दुरितांचे तिमिर जावो प्रथमता अंधकार दूर होऊ दे ही माऊलींची अपेक्षा आहे या अपेक्षांची पूर्तता आजही सारं जग मुठीमध्ये घेऊ पाहणाऱ्या आणि सुख ओरबाडून घेऊन पाहणाऱ्या माणसाकडून होत आहे असं वाटत नाही कोणी देवापुढे सज्जनांचा सहवास सद्गुणाची सोबत किंवा माणुसकीचा गहिवर मागत नाही . आर्ततेचा भाव आज भक्तीमध्ये दिसत नसल्याचा प्रत्यय सातत्याने येतो अशाही प्रतिकृतीमध्ये ज्ञानेश्वरी मध्ये स्वतःचा जीव ओतून त्या विचाराचा भावस्पर्श ज्यांच्या वाणीला आणि विचारांनाआणि जगण्याला लाभला आहे त्या आदरणीय नामदेव शास्त्रीजी अध्यात्मातील एक विवेकशील रसायन आहे. ज्यांना कळेना जीवन त्यांचे करी शास्त्र आहे हा विचार सातत्याने शास्त्रीजींच्या मुखातून आणि वाणीतून महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय आणि समाज अनुभवताना पहावयास मिळत आहे. संत नामदेव महाराज यांच्यासारखा संत विठ्ठलाच्या पायाशी विठ्ठल रूप होऊन समाधीस्थ होतो सद्गुरु वाचोनी सापडेना सोय या भावनेने माऊलीच्या आणि ज्ञानेश्वरीच्या चरण स्पर्श हा आपला आधार वृक्ष आहे ही भावना शास्त्रीजींच्या मुखातून सातत्याने पहावयास मिळते आजच्या परिस्थितीही भावसागर तारण्याचे भावबळ त्यांच्यात माऊलीच्या चिंतनाने बळावत आहे सद्गुरु भगवान बाबा यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचण्यासह ज्ञानेश्वरी ही हृदयात जोपासली त्याच बाबांच्या गादीवरून आदरणीय शास्त्रीजी माऊलींच्या प्रत्येक शब्दांचं जगाच्या कल्याणासाठी असलेले मूल्य प्रवाहित करत आहेत . ज्ञानेश्वरी सारखा सुखाचा सागर आणि त्यातील आनंदाचे आकाश तुमच्यापुढे उभा करत आहेत. संस्थान श्री क्षेत्र भगवानगड चे मठाधिपती म्हणून ज्ञानोबा तुकोबाचा विचार अखंडपणे उगवत्या पिढीच्या उमलत्या मनावर जोपासत श्रीक्षेत्र भगवानगड हे अध्यात्माचे ऊर्जा केंद्र बनविण्यामध्ये आदरणीय शास्त्रीजींचा मोलाचा वाटा आहे. रचनात्मक परिवर्तनाची बांधिलकी मानवाच्या व्यापक गहिवरातून जन्म घेत असते. या प्रक्रियेचा भाग आदरणीय आदरणीय शास्त्रीजी ठरत आहेत ही विशेष परमभाग्याची गोष्ट आहे. मानवातील दुःखमुक्तीचा ध्येयवाद संत ज्ञानेश्वर तुकारामासह सर्वच महापुरुषांनी जपला प्रत्येकाच्या भूमिका वेगळे असल्या तरी माऊलीच्या विचाराचं परखड मूल्यमापन आणि त्या मूल्यांचा परिप्रेक्ष आज सर्वांनी स्वीकारलेला आहे. संत विचाराची प्रगल्भ संस्कृती आणि विज्ञानाची वस्तुनिष्ठ वैचारिकता याची सांगड घालून समाज घडविण्याच्या संदर्भामध्ये शास्त्रीजी करत असलेले प्रयत्न हे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. समाजाला उपयुक्त ठरणाऱ्या मूल्यांचा पुरवठा त्यांच्या अभ्यासातून आणि वाणीतून सतत घडत राहावा यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच संत ज्ञानेश्वर तुकाराम यासह संत भगवान बाबा चरणी प्रार्थना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या आपणास हार्दिक शुभेच्छा
लेखक :
माधव चाटे सर गेवराई जि बीड
