महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

हंबर्डे महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन...

हंबर्डे महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन...  


आष्टी प्रतिनिधी 

 सालाबाद प्रमाणे याहीवर्षी सोमवार, दिनांक 18 ऑगस्ट 2025 सकाळी 10 वाजता आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ॲड. बी.डी. हंबर्डे महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षा संधी की संघर्ष, न्याय पालिकेचे स्वातंत्र्य व राजकीय हस्तक्षेप, कृषी तंत्रज्ञानात कृत्रिम बुद्धिमत्तेचे योगदान हे तीन वक्तृत्व स्पर्धेचे विषय आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिकाच्या स्वरूपात अनुक्रमे 5001रु, 3001रु, 2001 रु, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार असून संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,अतुल शेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने,सर्व मान्यवर संचालक मंडळ तसेच प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक समितीच्या वतीने उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे, उपप्राचार्य अविनाश कंदले, डॉ.रवी सातभाई, डॉ.अभय शिंदे, प्रा.जैनुल्ला खान पठाण, डॉ.रमेश भारुडकर, डॉ.संतोष वनगुजरे, प्रा.विजय अग्रवाल, डॉ.राजाराम सोनटक्के, प्रा.चंद्रकांत कोकणे, विशाल वर्धमाने, प्रा.रवींद्र डोंगरे, विद्यार्थी संसद व सांस्कृतिक मंडळ हे परिश्रम घेत आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुली राहील. स्पर्धकांनी आपले विचार फक्त मराठी भाषेतच मांडावेत. प्रत्येक स्पर्धकाला पाच मिनिटे वेळ मिळेल. स्पर्धेसंबंधी परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील असे संयोजक समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यावा असे प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी आवाहन केले आहे.