गेवराईत घोडके आणि घाडगे परिवाराचा 'शाही विवाह सोहळा' संपन्न; ५ हजारांहून अधिक जनसमुदायाची उपस्थिती
===================
गेवराई (प्रतिनिधी): शुभम घोडके, शहरातील बाजार तळ मैदान येथे रविवारी (२६ एप्रिल) सायंकाळी एक भव्य आणि शाही विवाह सोहळा संपन्न झाला. माजी नगरसेवक सुभाष (काका) घाडगे यांचे एकुलते एक चिरंजीव शुभम आणि चि.सौ.कां. निकिता (श्री. गोपीनाथ कचरु घोडके यांची कन्या) यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात आणि मंगलमय सायंकाळी साडेसात वाजता आनंदाच्या वातावरणात पार पडला. या विवाह सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांसह ५ हजारांहून अधिक वऱ्हाडी मंडळींनी उपस्थिती लावून नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले.संत-महंतांच्या उपस्थितीने सोहळा आठवडी बाजार तळ येथील विस्तीर्ण मैदानात पार पडलेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील संत-महंतांची विशेष उपस्थिती लाभली होती. त्यांच्या अमृतवाणीने आणि आशीर्वादाने विवाह सोहळ्याचे वातावरण अधिकच मांगल्याचे झाले होते. घोडके आणि घाडगे या दोन्ही प्रतिष्ठित कुटुंबांनी आलेल्या पाहुण्यांचे उत्साहात स्वागत केले. सुभाष काकांचे 'राजकीय वलय' आणि जनशक्तीचे दर्शनमाजी नगरसेवक सुभाष काका घाडगे यांनी गेवराई तालुक्याच्या राजकारणात आणि समाजकारणात आपल्या कार्यातून एक वेगळे अस्तित्व आणि मोठी ताकद निर्माण केली आहे. त्यांच्या याच दांडग्या जनसंपर्काचे दर्शन या विवाह सोहळ्यात घडले. केवळ गेवराई शहरच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यातून पाच हजारांहून अधिक लोकांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. वऱ्हाडी मंडळींच्या अलोट गर्दीमुळे बाजार तळ परिसर फुलून गेला होता.शाही थाट आणि विशेष व्यवस्थाविवाह सोहळ्यासाठी बाजार तळ येथे आकर्षक सजावट आणि शाही बैठक व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी ठीक ७:३० वाजता शुभमुहूर्तावर निकिता आणि शुभम यांचा विवाह लागला. यावेळी उपस्थितांनी अक्षता टाकून या ऋणानुबंधाच्या नात्याला शुभेच्छा दिल्या. श्री. गोपीनाथ कचरु घोडके आणि सुभाष काका घाडगे यांच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.या सोहळ्याचेआणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पत्रकार सुनील मुंडे आणि पत्रकार गजानन चौकटे यांच्या मार्गदर्शनाखाली सादरीकरण करणाऱ्या सहकाऱ्यांनी संगीतमय गीतांचा कार्यक्रम. पारंपारिक मंगलाष्टकांना आधुनिक संगीताची जोड दिल्याने संपूर्ण वातावरण भक्तीमय आणि आनंदमयी झाले होते. संगीताचा हा अविष्कार उपस्थित पाहुण्यांच्या विशेष पसंतीस पडला असून, लग्नमंडपात या सादरीकरणाची मोठी चर्चा रंगली होती. गोपीनाथ घोडके यांनी आयोजित केलेला हा विवाह सोहळा अत्यंत देखणा आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. विवाहस्थळी बदामरावजी पंडित यांचे आगमन होताच घाडगे परिवाराच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी पंडित यांनी वधू-वरांवर अक्षता टाकून त्यांना सुखी संसाराचा आशीर्वाद दिला. केवळ राजकीय संबंध न ठेवता एका कौटुंबिक जिव्हाळ्यापोटी पंडित यांनी या लग्नाला उपस्थिती लावल्याने घाडगे व घोडके कुटुंबियांनी कृतज्ञता व्यक्त केली.
