पृथ्वीराज मधूकर घुंबार्डे यांचे CA परीक्षेत यश संपादन.
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई शहरातील प्रसिद्ध व्यापारी श्री मधूकर ज्ञानोबा घुंबार्डे यांचे चिरंजीव पृथ्वीराज मधूकर घुंबार्डे यांनी नुकत्याच झालेल्या चार्टर्ड अकाऊंट च्या फायनल परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
भारतातील कठीण मानल्या जाणाऱ्या CA ची परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येते. या तिन्ही टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आर्थिक नोंदी ठेवणे, आर्थिक विवरणपत्रे तयार करणे आणि त्यांचे परीक्षण करणे यासंबंधी अधिकार प्राप्त होतात. इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारे घेण्यात येणाऱ्या या महत्त्वाच्या परीक्षेमध्ये गेवराई शहरातील प्रसिद्ध असे व्यापारी श्री. मधूकर ज्ञानोबा घुंबार्डे यांचे चिरंजीव पृथ्वीराज मधूकर घुंबार्डे यांनी यश संपादन केले आहे. त्यांनी मे 2025 मध्ये दिलेल्या परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून त्यामध्ये उत्तीर्ण होऊन चार्टर्ड अकाऊंट (CA) ची पदवी पूर्ण केली आहे. या गौरव पुर्ण व दैदिप्यमान यशाबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
