आष्टी प्रतिनिधी
दहा वर्षांपूर्वीची गोष्ट.न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हंबर्डे महाविद्यालयात आजचे शिक्षण या विषयावर व्याख्यानाच्या निमित्ताने आले होते.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राचे उद्घाटन आणि व्याख्यान असा त्रिवेणी सोहळा यावेळी संपन्न झाला.न्या.नरेंद्र चपळगावकर आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ.दिलीपराव पोकळे या दोन्ही पाहुण्यांचा सत्कार एडवोकेट बी.डी. हंबर्डे भाऊ यांनी केला होता.कार्यक्रमाचे अध्यक्ष एडवोकेट त्रिंबक उर्फ बबनराव देशपांडे दादा हे होते.प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,यांनी प्रास्ताविक केले.तर डॉ.अभय शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला होता.महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिकवलेला शिक्षणाचा विचार मंत्र कसा महत्त्वाचा आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला होता.आष्टी तालुक्यातील स्वातंत्र्य सेनानींच्या आठवणीही त्यांनी यावेळी जागवल्या होत्या.सूत्रसंचालन कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी केले होते.दिनांक 4,5,6 फेब्रुवारी 2023 हे तीन दिवस वर्धा येथे संपन्न होत असलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक निवृत्त न्या.नरेंद्र चपळगावकर हंबर्डे महाविद्यालय,आष्टी जि.बीड येथे आले असता कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी त्यांना स्वतःची पुस्तके सप्रेम भेट दिली होती. ते वर्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले.च्या निमित्ताने अशा अनेक गोड आठवणी ताज्या झाल्या.