महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

उठ तरुणा जागा हो ! उद्योगाचा धागा हो !!विजय साळवे यांचे बेरोजगार तरुणांना अवाहन तरुणांनी देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी उद्योग व्यवसायाकडे वळावे - उद्योजक विजयकुमार वाव्हळ

उठ तरुणा जागा हो ! उद्योगाचा धागा हो !!
विजय साळवे यांचे बेरोजगार तरुणांना अवाहन

तरुणांनी देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी उद्योग व्यवसायाकडे वळावे - उद्योजक विजयकुमार वाव्हळ 

गेवराई/प्रतिनिधी

 आजच्या तरुणांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी उद्योग व्यवसायाकडे वळावे व आपले भविष्य निर्माण करावे असे प्रतिपादन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय साळवे यांनी आयोजीत सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी भव्य उद्योग मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना केले. पुढे बोलताना ते म्हणाले की भारत हा कृषी प्रधान देश आहे या देशांमध्ये अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते यासाठी तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळून स्वतःला व भारत देशाला सामर्थ्यवान बलशाली बनवावे कारण यामुळे देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल. दिनांक ०२ फेब्रु. रोजी  व्यंकटेश हॉल बजाज कॉम्प्लेक्स येथे झालेल्या विजय साळवे यांच्या वाढदिवसा निमित्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी भव्य उद्योग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध उद्योगपती विजयकुमार वाव्हळ हे उपस्थित होते. प्रसिद्ध उद्योगपती तथा दैनिक जय महाभारत चे मुख्य संपादक विजयकुमार वाव्हळ  आपल्या भाषणात म्हणाले की शासनाने विविध योजना अवलंबलेल्या आहेत विविध योजनेच्या माध्यमातून  युवकांना उद्योग व्यवसायाकडे वळण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे उद्योग शिबिरे शासनाच्या वतीने घेतल्या जातात व त्यावर मोठ्या प्रमाणात खर्चही केला जातो या योजनांचा तरुणांनी लाभ घेऊन विविध उद्योग क्षेत्रात पदार्पण केले पाहिजे त्यामुळे त्यांचे स्वतःचे त्यांच्या कुटुंबाचे त्यांच्या समाजाचे आणि पर्यायाने भारत देशाचे कल्याण होऊन भारत देश आर्थिक दृष्ट्या आणखीनच सक्षम बनवून बलाढ्य बनण्यास मदत होईल. याप्रसंगी औरंगाबाद येथील उद्योग प्रकल्प अधिकारी माननीय प्राध्यापक सचिन डोंगरदिवे व प्रा. शंकर वाघमारे यांनी उद्योग व्यवसायामध्ये उतरण्या साठी तरुणांना कसे मार्गदर्शन करण्यात येईल व काय करता येईल या विषयी सविस्तर माहिती उपस्थित तरुणांना दिली. तर विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दयानंद स्वामी , वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष शैलेश कांबळे , चंद्रकांत खरात , व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एस बी मोरे , यांनी आपले तरुणांच्या विकासासंदर्भात विचार व्यक्त केले. आरापिआय चे महेंद्र निकाळजे यांनी सुद्धा तरुणांनी महापुरुषांच्या विचाराला अनुसरून व उद्योग व्यवसायात सुद्धा शीलवान चारित्र्यवान बनवून आपला विकास करून घ्यावा असे सांगितले.
 या  प्रसंगी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय साळवे यांचा वाढदिवस असल्याने उपस्थित सर्व मान्यवरांसह उपस्थित त्यांच्या चाहत्यांनी वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी बांधकाम सभापती राजेश साळवे हे होते. तर विशेष अतिथी म्हणून अमोल डोंगरे , वसंत वावळकर, प्रशांत चांदमारे , सदानंद प्रधान ,चंद्रकांत टाकणकार, सुरेश लांडगे, किशोर सातपुते, किशोर टाकणखार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष पंडित ओव्हाळ यांनी केले तर या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी उद्योग मार्गदर्शन मेळाव्यास उपस्थित असलेल्या तरुणांनी यामधून उद्योग व्यवसायाकडे वाढण्याचा संकल्प केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंडित ओव्हाळ, वचिष्ठ लांडगे , विशाल साळवे, अतुल भदर्गे,संदेश डोंगरे, बबन चोपडे, दीपक कसबे, निशिकांत टाकणखार, चंद्रकांत लोंढे, धम्मा साळवे, रमेश बल्लाळ, संतोष कांबळे, बाळू साळवे, सचिन वाघमारे, गोविंद फुलवरे, धमानंद जावळे, बाळू कांबळे, धम्मपाल सातपुते, अजय साळवे, विक्की मराठे, अमर इंगळे, सिद्धांत सुरवसे, रोहित मोरे , आकाश आठवे ,  प्रतीक साळवे, गौतम जावळे, आकाश टाकणखार, विशाल सोनपसारे यांच्यासह शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओमप्रकाश टाकणखार, विश्वनाथ तोडके, अतुल भदर्गे, किशोर टाकणखार यांनी प्रयत्न केले.