महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

दिनकर शिंदे यांना जिल्हास्तरीय दर्पण पुरस्कार जाहीरमहाराष्ट्र पत्रकार संघाकडून 4 फेब्रुवारीला होणार गौरवविविध क्षेत्रातील 15 जणांचा होणार सन्मान

दिनकर शिंदे यांना जिल्हास्तरीय दर्पण पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र पत्रकार संघाकडून 4 फेब्रुवारीला होणार गौरव

विविध क्षेत्रातील 15 जणांचा होणार सन्मान

गेवराई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र पत्रकार संघ बीड यांच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय दर्पण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दिनकर शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दिनकर शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील 15 जणांना मान्यवरांच्या हस्ते वेगवेगळ्या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बापूसाहेब हुंबरे यांनी दिली आहे.
    गेल्या 28 वर्षांपासून जनहितासाठी निरपेक्ष, रोखठोक आणि सडेतोड लिखाण करून, अनेक प्रश्न मार्गी लावल्याने महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने हा पुरस्कार पत्रकार दिनकर शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. दि 4 फेब्रुवारी 2023 रोजी साई सिध्दी हॉल, बेदरे लॉन्सच्या शेजारी, कोल्हेर रोड गेवराई येथे होणाऱ्या कार्यक्रमात, बीड समाज कल्याण सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे, प्रभारी बीड जिल्हा उधोग केंद्र महाव्यवस्थापक तांदळे, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, आ लक्ष्मणराव पवार, माजी जि प अध्यक्ष विजयसिंह पंडित, तहसीलदार सचिन खाडे, पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार, गटविकास अधिकारी वैभव जाधव, न प मुख्याधिकारी विशाल भोसले, महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, चिंतेश्वर संस्थानचे मठाधिपती दिलीप बाबा घोगे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. 
    दिनकर शिंदे यांना नुकताच  मौलाना अब्दुल कलाम आझाद जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार, आणि अप्रतिम मीडिया मुंबईचा, चौथास्तंभ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मिळाला असून आता त्यांना जिल्हास्तरीय दर्पण हा तिसरा पुरस्कार जाहीर झाला आहे. 
     या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मनोहर पिसाळ, देवेंद्रसिंह ढाका, शिवाजी वसट, डॉ सुहास घाडगे, डॉ चंद्रशेखर गवळी, शिवाजी झेंडेकर, पीएसआय संदीप काळे, कालिदास नवले, संभाजी गलधर, दिगंबर टेकाळे, विजय बोराडे, देवा ननवरे रवींद्र गाडे, रावसाहेब बेदरे यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. याप्रसंगी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा संपादक बापूसाहेब हुंबरे, जिल्हाउपाध्यक्ष प्रा चंद्रकांत नवपुते, जिल्हा सचिव विनायक उबाळे, जिल्हा कार्याध्यक्ष चक्रधर घोडके आदींनी केले आहे.