महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री. भागवतजी कराड यांच्या हस्ते संतोष भंडारी यांना सर्वोत्कुष्ट बॅकर चा पुरस्कार प्रदान.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री. भागवतजी कराड यांच्या हस्ते संतोष भंडारी यांना सर्वोत्कुष्ट बॅकर चा पुरस्कार प्रदान.
गेवराई प्रतिनिधी

बॅकींग सेवेसोबत अनेक नव तरूणंना उद्योग व्यवसायात प्रेरणा देऊन उद्योजक घडवणे हा ध्यास मनाशी बांधलेल्या संतोष भंडारी यांना नुकताच रेड एफ.एम.93.5 च्या प्राईड आँफ छत्रपती संभाजीनगर च्या वतीने सर्वोत्कुष्ट बॅकींग सेवेबद्दल सर्वोत्कुष्ट चेअरमन हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख आतिथी म्हणून केंद्रीय मंत्री डाॅ.भागवतजी कराड,आमदार संजयजी सिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणांत  संतोष भंडारी यांच्या कार्यांचा गौरव करत त्यांचे अभिनंदन केले.बॅकींग सेवेत फक्त ठेवी स्विकारणे व कर्ज देणे या गोष्टी न करता अनेक तरूणांच्या हाताला काम अन् मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचे स्वप्न मनाशी बाळगून कित्येकांचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने बॅकींग सेवा पुरवणा-या छत्रपती मल्टीस्टेट या संस्थेचा नावलौकीक तसा सर्वत्र आहेच.पण याच कार्याची दखल घेत आजवर त्यांना विविध पुरस्काराने सन्मान मिळालेला आहे.त्याप्रमाणे संस्थेचे चेअरमन संतोष भंडारी यांना बँकिंग क्षेत्रांमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी बद्दल भारताचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री.भागवतजी कराड व आमदार संजयजी सिरसाट  यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा व छत्रपती मल्टीस्टेट या संस्थेचा गौरव करण्यात आला.या पुरस्कारास उत्तर देतांना संतोष भंडारी यांनी सांगितले की,आम्ही येत्या काळात आर्थिक क्षेत्रात टेक्नालाॅजीचा आधिक प्रभावीपणे वापर करून सर्वोत्तम बॅकींग सेवा देण्याच्या विचारातून काम करणार आहोत.प्रत्येक छोट्यातल्या छोट्या घटकांपर्यत आमची बॅकींग सेवा पुरवण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिलेल्या या पुरस्काराने नक्कीच वैयक्तीक माझी व संस्थेची जबाबदारी वाढली आहे.रेड एफ.एम दिलेल्या या पुरस्काराबद्दल त्या सर्व टीमचे ही मनापासून आभार व्यक्त करतो.या पुरस्काराने मला खूप ऊर्जा मिळाली ती येत्या काळात आधिक सक्षमपणे काम करण्यास प्रेरणा देईल.भविष्यात छत्रपती मल्टीस्टेटच्या 100 शाखा स्थापन करून रोजगार निर्मिती करणे,छोट्या व्यावसायिकांना अर्थ साह्य देऊन आर्थिक पाठबळ देणे.हे छत्रपती मल्टीस्टेटचे मुख्य उदिष्ट असेल.असे मत संतोष भंडारी यांनी यावेळी व्यक्त केले.छत्रपती मल्टीस्टेट व चेअरमन संतोष भंडारी यांना आतापर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.या पुरस्काराने संतोष भंडारी व छत्रपती मल्टीस्टेटवर अभिनंदनाचा व कौतुकांचा वर्षाव होत आहे.