अट्टल महाविद्यालयात महाराष्ट्र हिंदी परिषदेचे २९वे अधिवेशन उत्साहात संपन्न
गेवराई (शुभम घोडके) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई येथे दि. २७ व २८ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या २९ व्या अधिवेशनानिमित्त 'आजादी के ७५ वर्ष का हिंदी साहित्य' या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभरातील ११२ हिंदी विषयाच्या प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या २९ व्या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्र हिंदी परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. मधुकर खराटे हे होते तर उद्घाटक म्हणून एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई येथील माजी हिंदी विभाग प्रमुख प्रो. सत्यदेव त्रिपाठी तसेच बीजभाषक म्हणून जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली येथील भारतीय भाषा केंद्राच्या प्रो. गरिमा श्रीवास्तव यांची उपस्थिती होती.
परिषदेचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्य व संयोजक प्रो. रजनी शिखरे यांनी केले तर महाराष्ट्र हिंदी परिषदेचे अध्यक्ष डॉ. जिजाबराव पाटील यांनी महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या कार्यावर प्रकाश टाकून आयोजनामागील भूमिका विषद केली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते 'अक्षरा' या शोधपत्रिकेच्या दोन खंडांचे प्रकाशन करण्यात आले. ज्यात ९० शोधनिबंधांचा समावेश आहे. उत्कृष्ट शोधनिबंधासाठी डॉ. विजय शिंदे यांना २१०० रुपये रोख, प्रमाणपत्र,शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
हिंदी भाषा व साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख प्रो. माधव सोनटक्के यांना 'सारस्वत सन्मान' रु. ५१०० रोख, प्रमाणपत्र,शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उद्घाटन समारंभाचे आभार महाराष्ट्र हिंदी परिषदेचे सचिव डॉ. गजानन चव्हाण यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. संतोष नागरे यांनी केले.
राष्ट्रीय चर्चासत्राच्या बीजभाषक प्रो. गरिमा श्रीवास्तव यांनी स्वातंत्र्यानंतर लिहिले गेलेले हिंदी साहित्य व विविध प्रवाह यावर प्रकाश टाकला.
'आजादी के ७५ वर्ष का हिंदी कथा साहित्य, काव्य, नाटक व अन्य साहित्य' या शीर्षकाखाली चार स्वतंत्र सत्र घेण्यात आले. या सत्रांमध्ये सत्राध्यक्ष म्हणून प्रो. दत्तात्रय मुरूमकर (मुंबई), डॉ. मिथिलेश अवस्थी (नागपूर), प्रो. सुधाकर शेंडगे (औरंगाबाद) व विषय- प्रवर्तक म्हणून डॉ. सुरेश शेळके (औंढा नागनाथ), प्रो.पंढरीनाथ पाटील (जळगाव), प्रो.अनिल काळे (नारायणगाव) यांनी आपले विचार मांडले .
याप्रसंगी शोधनिबंधांचे वाचन करण्यात आले.
त्यानंतर अधिवेशनामध्ये विविध विषयावर खुली चर्चा झाली.
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. चंद्रदेव कवडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पांडुरंग पाटील, डॉ. बाबासाहेब कोकाटे, डॉ. देवीदास बामणे यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या आजीवन सदस्यांना शैक्षणिक , साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षीय समारोपप्रसंगी डॉ. चंद्रदेव कवडे यांनी राष्ट्रभाषा हिंदीच्या प्रचार- प्रसारासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. डॉ. अमोल पालकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने अधिवेशनाची सांगता झाली.
महाराष्ट्र हिंदी परिषदेचे २९वे अधिवेशन व राष्ट्रीय चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष अमरसिह पंडित, सचिव आ. सतीश चव्हाण तसेच महाविद्यालय विकास समिती सदस्य दीपक आतकरे, ॲड. हरिश्चंद्र पाटील, ॲड.आनंद सुतार, भगवानराव मोटे, जालिंदर पिसाळ यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य व संयोजक प्रो. रजनी शिखरे, सह -संयोजक प्रा. संतोष नागरे, उप प्राचार्य प्रो. विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, आय. क्यू .ए .सी. समन्वयक डॉ. प्रवीण सोनुणे, प्रबंधक बप्पासाहेब पिंपळे , अधीक्षक भागवत गवंडी, डॉ. समाधान इंगळे, प्रा. हनमंत हेळंबे, डॉ. अमोल शिरसाट, डॉ. बालाजी रुपनर, प्रा. एन. आर. गोरे, डॉ. रेवणनाथ काळे, प्रा. अरुण भराडे, प्रा.बाळासाहेब जोगदंड, डॉ. मनोजकुमार ठोसर, डॉ. सचिन शिंगाडे, सुदर्शन निकम आदिंनी विशेष परिश्रम घेतले.