महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

गेवराईच्या सिध्देश्वर मंदिरात शिवपुराण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा भाविकांनी लाभ घ्यावा

गेवराईच्या सिध्देश्वर मंदिरात शिवपुराण 
===================
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा भाविकांनी लाभ घ्यावा!
===================

गेवराई (प्रतिनिधी) गेवराई शहरातील सावता नगर भागात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री. सिद्धेश्वराच्या कृपेने व गुरुवर्य परमपूज्य दिलीप बाबा उर्फ मसाननाथ महाराज घुगे श्री भगवान चिंतेश्वर मंदिर ,गेवराई यांच्या कृपा आशीर्वादाने श्री शिव महापुराण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

येथील तरुण बांधवांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिद्धेश्वर संस्थान सावता नगर गेवराई येथे सातत्याने धार्मिक अध्यात्मिक सांप्रदाय सेवेतून वेगवेगळे उत्सव समितीच्या वतीने करण्यात येतात यात श्री .राम कथा ,भागवत कथा किर्तन महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह गेल्या बारा वर्षापासून अखंडितपणे आहे यावर्षी श्री. शिवमहापुराण कथा प्रवक्ते श्री . श्री ह. भ. प. श्रीहरी महाराज रसाळ, व व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व सत्यनारायण महाराज लगड यांच्या संकल्पनेतून संपन्न होणार आहे
 तसेच  दैनंदिन कार्यक्रम पारायणाची वेळ सकाळी साडेसात व शिवपुराण कथेची वेळ संध्याकाळी सात असुन24 मार्च सोमवार रोजी आरंभ होणार असून 31 मार्च  रोजी यांच्या ह.भ.प.श्रीहरी महाराज रसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होईल. नंतर महाप्रसाद वाटप होईल. परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले.