जागरूक पालक सुदृढ बालक" मोहीम आष्टीमध्ये जोमात
आष्टी प्रतिनिधी
महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागामधील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत "जागरूक पालक सुदृढ बालक" अभियान दि. 9/02/2023 पासून पूर्ण महाराष्ट्रा मध्ये राबविण्यात येत असून
आज दि. 10/2/2023 रोजी मोतीलाल कोठारी विद्यालय कडा या ठिकाणी RBSK कार्यक्रमा अंतर्गत जागरूक पालक सुदृढ बालक या मोहिमेअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून नेत्र दोषावरील विध्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली .
नेत्र दोषाचे 73 मुले लाभार्थी ठरले त्यांची नेत्र तपासणी डॉ. नागरगोजे सर यांनी केली .
या कार्यक्रमासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे सर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे मॅडम व ग्रामीण रुग्णालयातील डॉ. ढाकणे सर उपस्थित होते.
सदरील आरोग्य तपासणीसाठी विद्यालयातील मुख्यध्यापक श्री. पडोळे सर व त्यांच्या सर्व शिक्षकांनी खूप चांगले सहकार्य केले .
आरोग्य तपासणी साठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील डॉ. विनोद मुळे डॉ. सुषमा सुंबे श्री धस संदीप श्रीमती दैवशाला आगवणे यांनी परिश्रम घेतले.