१००रुपयात दिवाळी गिफ्टची नुसती घोषणा
---------------------------------------
गेवराई (प्रतिनीधी) रेशन कार्ड धारकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळी गिफ्ट मिळणार असल्याचा गाजावाजा झाला शिधा पत्रिका धारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेजची घोषणा करण्यात आली होती परंतु दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना सुद्धा दुकानादार यांच्या कडून सांगितले जाते की अजुन पॅकेज आले नाही मिळणार आहे किंवा नाही यांची काही कल्पना देखील नाही म्हणून रवा, चणाडाळ, साखर यांचे प्रत्येकी एक-एक किलो, तर एक लीटर तेल असे पॅकेज अवघ्या शंभर रुपयात मिळणार असल्याची नुसती घोषणा होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात असुन त्यामुळे अनेक कुटुंबांची दिवाळी गोड होईल का ? ग्रामीण भागात शहरातही दुकानदाराकडे दिवाळी गिफ्टचे पॅकेज अजून उपलब्ध नाहीत म्हणून कार्डधारक दिवाळी गिफ्ट मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत मायबाप सरकारने लवकरात लवकर दिवाळी गिफ्ट देऊन गोरगरीब नागरिकांची दिवाळी गोड करावी अशी मागणी सर्वसामान्य माणसाकडून होत आहे.