अतिवृष्टीनेमुळे पिकांसोबत मातीही गेली वाहुन, शेतकऱ्यांना सरसकट हे. 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या - ॲड.गणेश कोल्हे
बीड (प्रतिनिधी) मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीने धुमाकूळ घातलेला आहे.हाता तोंडाशी आलेला घास हा निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतलेला आहे.अगोदरच मराठवाड्यामध्ये गोगलगायीच्या संकटामुळे व लम्पी आजारामुळे शेतकरी बांधव हा खूप मोठ्या संकटात सापडलेला होता.गोगलगायीच्या हल्ल्यामुळे दोन - तीन वेळेला पेरणी करावी लागली होती.त्यामध्येच बीड जिल्ह्यामध्ये पिक विमा व नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही.संध्या
अतिवृष्टीने पिकांसोबत मातीही वाहुन गेली आहे. तर सरकार ने तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी असे ॲड.गणेश कोल्हे यांनी प्रसिध्द पत्रकाद्वारे सांगितले आहे.
तसेच ते म्हणाले की अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे .पेरणीसाठी व मशागतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे झालेले नाही . त्यातच कसेबसे खरीप हंगामाचे पिक काढणीला आले त्यावेळी सतत धार पाऊस सुरू झाला व गेल्या आठ-दहा दिवसापासून संपूर्ण मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे.सोयाबीनचे पीक संपूर्णतः पाण्याखाली गेलेले असून कापूस पिकाचे सुद्धा अतोनात नुकसान झालेले आहे.संपूर्ण खरीप हंगामातील पिके नष्ट होत आलेली आहेत व यामुळे शेतकरी वर्ग हा अतिशय खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे . पंचनामे न करता सरसकट शेतकरी बांधवांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत शासनाने ताबडतोब करावी. अगोदरच शेतकरी आत्महत्या मध्ये संपूर्ण भारत देशामध्ये मराठवाडा हा एक नंबरला असल्यामुळे या शेतकरी बांधवांच्या आत्महत्यांचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे . जर शेतकरी बांधवांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे न करता प्रती हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई सरकार ने द्यावी. असे ॲड.गणेश कोल्हे यांनी प्रसिध्द पत्रकाद्वारे सांगितले आहे.