महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

नातीला जिल्हाधिकारी करायच स्वप्न पाहणारे विठ्ठल-रखुमाई ...!

नातीला जिल्हाधिकारी करायच स्वप्न पाहणारे विठ्ठल-रखुमाई ...!

     त्या रोज पहाटे तीन वाजता उठायच्या. मुलांना उठवून अभ्यास करून घ्यायचा. आपले अपूर्ण राहीलेले शिक्षणाचे स्वप्न त्या मुलांमध्ये पाहत होत्या. अंगणातील तुळसीला पाणी घालून आणि टारगेट ठरवून चिकाटीने प्रयत्न केले. अखेर, मेहनतीचे फळ मिळाले. तिन्ही मुले शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत झाली. स्वप्न साकार झाल्याचा आनंद झाला. एवढ्यावरच नाही थांबायचे, आणखी एक स्वप्न पूर्ण करायचा निश्चय दोघांनी केलाय. आपली मुलं मोठी झाली. उच्च पदावर गेली. आता, आणखी एक स्वप्न साकार करायचे आहे. गोड , फुलासारखी उमलत जाणाऱ्या नातीला जिल्हाधिकारी (आयएएस ) करायचय. त्या दोघांचा ही हौसला बुलंद आहे. या अर्थाने, तत्वज्ञानी खलील जिब्रान म्हणतो, महत्त्वाकांक्षी माणसांना दीर्घायुष्य लाभते. 

     जगाच्या बाजारात आपण कोणतीही वस्तू खरेदी करूत. मात्र, कितीही पैका-अडका देऊन आई-वडील मिळवता येत नाहीत. पोटच्या लेकरांसाठी उपाशी राहून त्यांच्या भवितव्याचा विचार करणारे केवळ आई-बापच अस्तात. अशाच, एका आदर्श जोडीची अचानक ओळख झाली. भेटीचा योग आला. संवाद झाला. दोन वर्षापूर्वी अंबाजोगाई (बीड) येथे लाॅ ची परीक्षा होती. आम्ही सह कुटुंब गेलो होतो. तिथे आबांची भेट झाली. त्यांनी नाव ,गाव विचारले. ते म्हणाले 
माझा मुलगा गेवराई येथे तहसीलदार आहे. परीक्षेसाठी माझ्या पुतण्याला घेऊन आलोय. चार चाकी 
गाडी आहे. गाडीत जागा ही आहे. यायचे असेल तर चला ? त्यांच्यातला साधेपणा मनाला स्पर्श करणारा होता. ही आमची पहिली ओळख होती. योग असा की, आबा ही भेटले आणि तिर्थस्वरूप आईची (काकू) भेट ही झाली. 
 खाडे पाटलांचे सधन कुटुंब पण दुष्काळी चटक्याचा नेटाने सामना करणारी कष्टाळू माणसे. दोघांनी मिळून कष्ट केलेत. एकाने घर सांभाळून मुलांना घडविले. दुसर्‍याने शेतीत कष्ट केलेत. खर म्हणजे, दोन चाकी रथ, दोघांनी कष्टाने कोरून सजवला. कष्टाचे चीज झाले आहे. घरात पाच प्रशाकीय अधिकारी  आहेत. दोन्ही मुले, दोन्ही सुना उच्च पदावर कार्यरत आहेत. धाकटा तहसीलदार, मोठा मुलगा केन्द्रीय पोलीस दलात उच्च पदावर, धाकटी सून अभियंता, मोठी सून आरएफओ,  लाडाची लेक मोनिका खाडे उपायुक्त पदावर आहेत. ही सगळी किमया आधुनिक काळातल्या सत्यभामा बाळसो खाडे नावाच्या एका अल्पशिक्षित आईने केली आहे. खर म्हणजे, विठ्ठल-रखमाई ची आदर्श जोडी..!  
   एखादे टारगेट ठरवून, एका समर्पित भावनेतून ते पूर्ण करता येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणून आधुनिक काळातल्या सौ. सत्यभामा (काकू) बाळासाहेब (आबा) खाडे यांच्याकडे पहाता येईल. कुणालाही नवल वाटेल, अशी थक्क करणारी त्यांची स्वतःची  "आयडीया" वैखरीची वाट तुडवून पुढे जाण्याची धडपड करणाऱ्यां साठी 
प्रेरणा शिखर म्हणून उभारी देत राहील. 

    सौ. सत्यभामा बाळसो ( बाळासाहेब) उर्फ आबा खाडे, या मान तालुक्यातील पळस जि. सातारा जिल्ह्य़ातील आहे. घरात एकुलती एक असलेल्या सत्यभामा यांचा विवाह खाडे कुटुंबातील बाळासाहेब यांच्याशी झाला. गावात त्यांना आबा नावाने ओळखतात. 
आपण निरक्षर राहीलोत. या विषयी काकूंच्या मनात खंत होती. मात्र, आपल्या मुलांना  शिक्षण देऊन मोठ्या हुद्यावर बघायचेच. हे टारगेट त्यांनी आधीच ठरवून टाकले होते. त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास, जिद्ध आणि चिकाटी आहे. रोज पहाटे तीन वाजता उठून स्वतःच्या आणि दिराच्या मुलांना उठवून अभ्यास करून घेत असत.
पहाटेची हवा, शांत, निरामय वातावरण मुलांची बुद्धीमत्ता वाढविते. असा त्यांचा स्वतःचा सिद्धांत..! 
काकू घरप्रपंच आणि आबा शेतीत कष्ट करायचे. पत्नीने शेती, घरकाम करून मुलांना सुसंस्कारित केले आहे. माझा त्यातला वाटा, त्या मानाने कमीच, सगळे श्रेय पत्नीला जाते, हे सांगणार्‍या आबांचा आपोआप मोठपणा सिद्ध होत जातो.  
बाळासाहेब खाडे पाटील ( आबा ) घरात धाकटे आहेत. एकत्र कुटुंब आहे. आबांचे वडील रंगनाथनराव गावात प्रतिष्ठित नागरिक होते. गावात त्यांना मानसन्मान होता. शेटजी नावाने त्यांना ओळख मिळाली होती. गावगाडा नीटपणे चालावा, गावची पोरं शिकली पाहिजेत. आपण निरक्षर राहीलो पण उद्याची पिढी साक्षर झाली तरच गावचा नावलौकिक होईल, अशी त्यांची धारणा होती. 1957 च्या काळात अडचणीत आलेल्या शाळेतील शिक्षकांचा पगार,  शेठजींनी घरातून दिला होता. म्हणूनच, खाडे कुटूंबाला गाव विसरत नाही. ते म्हणतील ती उगवती..! आबांच्या वडलांना चार भाऊ होते. गावापण सांभाळून सलोखा निर्माण करणाऱ्या खाडे यांच्या वाड्याला पांडवांचा वाडा अशी ऐतिहासिक ओळख मिळाली आहे. 
   कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पावलांचा स्पर्श होऊन पावन झालेली आणि त्यांच्या कष्टाने कोरून उभी राहीलेली, पळसीच्या हनुमान विद्यालयाच्या चार भिंतीत असंख्य विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत गेले आहेत. गाव शिक्षणाच्या प्रवाहात आल्याचा काकूंना अभिमान वाटत आलाय.
   काकू यांचे माहेर इंदापूर तालुक्यातील भिगवण च्या पुढे  अक्कोल..! घरात एकुलती एक, चार भाऊ..! दीडशे एक्कर शेती. पाटील घराणे आहे. पण, कसला तोरा नाय की निरर्थक बडेजाव नाही. अगदी वामन मुर्ती आहे. काटक आहेत. कष्टावर विश्वास आहे. बोलक्या आहेत. कडक शिस्तीच्या आहेत. मात्र, समाजातील बदलाचे भान ठेवून वागणारा त्यांचा स्वभाव, काळाची गरज ओळखून पाऊले टाकताना दिसतो. 
काकू, सांगत होत्या..!
   भैय्या (तहसीलदार सचिन खाडे) ने तीन चार ठिकाणी नौकरी केली. त्या म्हणायच्या, 
हे बघ, छाटछूट नौकरी करूच नकोस. इमेज, पाॅवर असलेली नौकरी मिळवण्याची संधी शोध. राजीनामा दे अन् तसाच पुण्याला जाऊन अभ्यासाला लाग. ज्ञानेश्वर (मोठा भाऊ) नौकरीला लागलाय ना, तो पगार गावाकडे देऊ नका आणि पाठवू नका. तिघांचा ही खर्च त्यात भागवून, बघा जमतय का..! अखेर, आईचा आशीर्वाद सार्थ ठरला. सचिन खाडे प्रशासन सेवेत तहसीलदार झाले. जेष्ठ चिरंजीव ज्ञानेश्वर खाडे यांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न केले. लग्नाचा थाटमाट न करता उर्वरित पैसा शाळेच्या ग्रंथालयासाठी देऊन एक आदर्श उभा केला आहे. दहा हजार लोकसंख्या असलेल्या गाव शाळेची गुणवत्ता आजही टिकून आहे. 1957 ची हायस्कूल आहे. गावाला शैक्षणिक वारसा लाभला आहे.
   काकूंना वाटते, मुली शिवाय जीवनात "राम" नाही. म्हणूनच, नातीला आपीएस-आयएएस करायचे आहे. आमची चर्चा सुरू असतानाच त्यांची परी सारखी नात आली. तेव्हा तिच्याकडे अंगुलीनिर्देश करून त्या म्हणाल्या..! बघा, आमची आयएएस आली. लोक कवी प्रा. मोरे म्हणतात, मुलगा म्हणतो आईला, अग आई,
दिव्याची वात मोठी कर मला वाचता येत नाही. बाप म्हणतो, आ
अग,ऐ..! दिव्याची वात लहान कर, मला झोप येत नाही. रात्रभर आई, दिव्याची वात वर - खाली करत राहीली अन वाती सारखी जळत राहीली.. ! आबा-काकू आपणास आपणास उदंड आयुष्य लाभो, तुमचे स्वप्न सत्यात उतरेल, सत्य हेच शिव आहे. चिंतेश्वरा चरणी एवढी एकच प्रार्थना..!

सुभाष सुतार 
( पत्रकार )