उमापूर येथे महाशिवरात्री निमित्त शिव महापुराण कथा महारुद्रयाग यज्ञ सप्ताह चे आयोजन
----------------------------------------
गेवराई ( प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील उमापूर येथिल प्रज्यनेश्वर मंदिराच्या परिसरात महाशिवरात्र निमित्ताने बुधवार दि.१५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संगीतमय शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून शिव कथाकार ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज थोरात (जालना) यांच्या अमृततुल्य वाणीतून दररोज रात्री ८ ते 11 या वेळेत कथा होणार आहे तसेच बुधवार दि.२२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ते ०१ या वेळेत श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान चे मठाधिपती महंत दत्ता महाराज गिरी यांचे काल्याचे किर्तन होणार त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ उमापूर व परिसरातील भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.