सालेगाव येथील आत्महत्याग्रस्त राचोटकर कुटुंबांना नागनाथ महादापुरे व उज्वलाताई गुरसुडकर पुढाकारातून आणि नाभिक टायगर सेना मार्फत आर्थिक मदत
नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
नांदेड: मौजे सालेगाव तालुका नायगाव येथील आत्महत्याग्रस्त राचोटकर परिवारास नागनाथ महादापुरे व उज्वलाताई गुरसुडकर यांच्या पुढाकाराने नाभिक टायगर सेना मदतकक्ष मार्फत आज दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी शनिवार रोजी आर्थिक मदत करण्यात आली.याप्रसंगी नाभिक टायगर सेना प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ कुरमेलवार व महाराष्ट्रभुषण नागनाथ महादापुरे आणि नाभिक एकता महासंघाच्या मराठवाडा अध्यक्षा उज्वलाताई गुरसुडकर
अखिल भारतीय जिवा सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष राजीव राचोटकर व उतमराव राचोटकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.संतोषभाऊ कुरमेलवार यांनी सांगितले की, नाभिक टायगर सेनेच्या माध्यमातून व नागनाथ महादापुरे आणि उज्वला ताई गुरसुडकर पुढाकारानेच ही मदत होऊ शकली यांच्या सहकार्य व प्रयत्नांमुळेच ही मदत होऊ शकली याबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी नागनाथ महादापुरे यांनी ही सांगितले की, उज्वलाताई व संतोषभाऊ यांच्या चांगल्या विचारांना आमचे नेहमीच सहकार्य आहे अणि राहिल अशी ग्वाही दिली.
नांदेड जिल्ह्यात सेवेच्या माध्यमातून एका नविन पर्वाला सुरूवात झाली आहे असेही सांगितले.
उज्वलाताई गुरसुडकर यांनी राचोटकर परिवारास सांगितले की, खचुन न जाता मुलांच्या हितासाठी खंबीर बना असा सल्ला दिला.
आर्थिक स्वरूपातील ही मदत आत्महत्याग्रस्त शिवशांत राचोटकर यांच्या पत्नीच्या बॅंक अकाऊंट मध्ये जमा करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले.
मदत स्विकारताना राचोटकर परिवार खुपच भाऊक झालेला दिसुन येत होता.
उतमराव राचोटकर परिवाराकडुन तिघांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी सालेगाव गावातील प्रतिष्ठित नागरिक गणपत मनुरे, संतोष मनुरे, गणपतराव राचोटकर, सुनिल श्रीमंगले, मनोहर राचोटकर, आनंदा राचोटकर, संतोष लव्हाळे, मोहन राचोटकर, पप्पू राचोटकर आदिंची उपस्थिती होती.