आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाच्या वतीने मोजे टाकळसिंग येथे दि.09 ते15 जानेवारी 2023 रोजी युवकांचा ध्यास ग्राम.. शहर विकास,राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात दि.12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांच्या स्मरणार्थ कवी,पत्रकार संतोष दाणी यांच्या अध्यक्षतेखाली बालकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.यात हरीश हातवटे,युवराज वायभासे,अभय शिंदे,राजेंद्र लाड,इंद्रकुमार झांजे सहभागी होणारा असून कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन हे सूत्रसंचालन करणार आहे.शिबिर उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षपद किशोर नाना हंबर्डे भूषविणार आहेत.उद्घाटक नायब तहसीलदार श्रीमती शारदा दळवी,प्रमुख पाहुणे म्हणून सभापती बद्रीनाथ जगताप,अतुल शेठ मेहेर,अरुण दैतकर उपस्थित राहणार आहेत.असे प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे म्हणाले.प्रा.कैलास पन्हाळकर,कृषिभूषण रवींद्र कडलक, डॉ.संभाजी ओव्हाळ,प्रा.राम बोडखे, भाऊसाहेब जगताप,प्रा.भगवान वाघमारे, प्रा.रमेश भारुडकर,हे व्याख्याते विविध विषयावर सात दिवस व्याख्यान देणार आहेत.सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे,बी.डी.मेंगडे,बलभीम वाघमोडे हे समारोपाला उपस्थित राहणार आहेत.उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,अविनाश कंदले,डॉ.सुहास गोपणे, डॉ.रवी सातभाई,प्रा.महेंद्र वैरागे,प्रा.शुभांगी खुडे,डॉ.संतोष वनगुजरे,प्रा.आशोक भोगाडे, कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव हे शिबिरासाठी परिश्रम घेत आहेत.