गावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध:- ग्रा. पं.सदस्य श्रीहरी पवार
-----------------------------------
शुभम घोडके
गेवराई( प्रतिनिधी) ताकडगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारत नूतनीकरण उद्घाटनाचा 9 जानेवारी रविवार रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी पवार म्हणाले की आपण विकासासाठी, संघर्ष करत आहोत. गावातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामे केली पाहिजे, हाच ध्यास जोपासून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा, प्रयत्न देखील यापुढे करणार आहे ताकडगाव ग्रामपंचायत च्या निवडणुकीत गावकऱ्यांनी सेवेची संधी दिल्यानंतर गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार व लोकप्रतिनिधी यांचं नातं आता विश्वासाचं बनलं असुन विकास कामाची क्षमताही वाढते. हे आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयानंतर दाखवून दिले आहे. मायबाप मतदार बंधू-भगिनींनी प्रचंड विश्वास आमच्यावर टाकला आणि तुम्ही शब्द पाळला, आता विकासाची जबाबदारी संपूर्णपणे आमची आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या, मागण्या व विकासकामे पूर्ण करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे असे अभिवचन ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी पवार यांनी व्यक्त केले. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.